"लग्न करून घ्या, दाढी वाढवू नका..."; लालूंच्या सल्ल्यावर राहुल गांधींनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 09:24 PM2023-06-23T21:24:24+5:302023-06-23T21:28:15+5:30

या बैठकीला 15 हून अधिक पक्षांच्या एकूण 30 नेत्यांची उपस्थिती होती. यानंतर आता 10-12 जुलै रोजी शिमला येथे बैठकीची दुसरी फेरी होणार आहे.

patna opposition meet Get married, don't grow a beard Rahul Gandhi gave this answer to Lalu yadav's advice | "लग्न करून घ्या, दाढी वाढवू नका..."; लालूंच्या सल्ल्यावर राहुल गांधींनी दिलं असं उत्तर

"लग्न करून घ्या, दाढी वाढवू नका..."; लालूंच्या सल्ल्यावर राहुल गांधींनी दिलं असं उत्तर

googlenewsNext

बिहारमधील पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला 15 हून अधिक पक्षांच्या एकूण 30 नेत्यांची उपस्थिती होती. यानंतर आता 10-12 जुलै रोजी शिमला येथे बैठकीची दुसरी फेरी होणार आहे. बैठकीत राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा सुरू असतानाच काही विनोदही घडले. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी शुक्रवारी त्यांच्या खास शैलीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची मस्करी केली. आपण लग्न करा, आम्ही वरातीत चालू, असे लालू म्हणाले.

लालू प्रसाद यादव यांनी केलं राहुल यांचं कौतुक -
लालू यांच्या मस्करीवर बोलताना राहुल गांधी म्हणाले, आपण म्हटले आहे तर (लग्न) होऊन जाईल. विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर लालूंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा उल्लेख केला. राहुल गांधी यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या अदानी मुद्द्याचा संदर्भ देत, आपण लोकसभेत छान काम केले, असेही म्हटले आहे.

'दाढी वाढवू नका' -
राहुल गांधींच्या दाढीकडे लक्ष वेधत लालू प्रसाद यादव म्हणाले, "आपण फिरायला लागलात तर दाढी वाढवली, यापेक्षा खाली नेऊ नका. आपण आमचा सल्ला ऐकला नाही. लग्न केलं नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. लग्न करा. आम्ही लोक वरातीत चालू. आपली आई (सोनिया गांधी) म्हणत होत्या की, आमचे ऐकत नाही, लग्न लावून द्या. आपण लग्न करा." लालू प्रसाद यांच्या या खीस शैलीवर तेथे उपस्थित नेत्यांनाही हसू आवरता आले नाही.

Web Title: patna opposition meet Get married, don't grow a beard Rahul Gandhi gave this answer to Lalu yadav's advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.