"ही महागाई म्हणजे मोदी सरकारची अंधाधुंद टॅक्स वसूली, कुणालाच होईना फायदा" 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 12:17 PM2021-07-30T12:17:55+5:302021-07-30T12:20:38+5:30

"सर्वच सामान महाग होत चालले आहे. ग्राहक त्रस्त आहेत. पण याचा थोडाही फायदा छोटे उत्पादक, दुकानदार अथवा शेतकऱ्यांना होत आहे का? नाही! कारण..."

People worried by inflation and the government is engaged in tax collection says Rahul Gandhi | "ही महागाई म्हणजे मोदी सरकारची अंधाधुंद टॅक्स वसूली, कुणालाच होईना फायदा" 

"ही महागाई म्हणजे मोदी सरकारची अंधाधुंद टॅक्स वसूली, कुणालाच होईना फायदा" 

Next

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ते ट्विटरच्या माध्यमाने सातत्याने सरकारवर निशाणा साधत असतात. ते अनेक वेळा ट्विटरच्या माध्यमाने सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात. यावेळी त्यांनी महागाईच्या मुद्यावरून सरकारला लक्ष केले आहे. ते म्हणाले, देशातील जनता महागाईने त्रस्त झाली आहे आणि मोदी सरकार टॅक्स वसुली करण्याच्या नादात लागले आहे.

खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत लिहिले आहे, सर्वच सामान महाग होत चालले आहे. ग्राहक त्रस्त आहेत. पण याचा थोडाही फायदा छोटे उत्पादक, दुकानदार अथवा शेतकऱ्यांना होत आहे का? नाही! कारण, ही महंगाई म्हणजे खरे तर मोदी सरकारची अंधाधुंद टॅक्स वसूली आहे.

संसदेचा वेळ वाया घालवू नका - 
तत्पूर्वी, खासदारांनी जनतेचा आवाज बनून राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली पाहिजे, असा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. मोदी सरकार विरोधकांना हेच काम करू देत नाही. संसदेचा आणखी वेळ वाया घालवू नका. महागाई, शेतकरी आंदोलन आणि पेगॅसस हेरगिरीवर चर्चा करावी, असे ट्विट राहुल गांधी यांनी गुरुवारी केले होते. 

“राहुल गांधींच्या मोबाइलमध्ये असे काय? की ते फॉरेंसिक चाचणीला घाबरतायत” -
यापूर्वी, राहुल गांधींसह विरोधी पक्षातील सर्व नेते संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू देत नाहीत. संसदेत जनतेला कोरोनाच्या संसर्गावर चर्चा हवी आहे. मात्र, विरोधकांना ते नकोय, अशी टीका संबित पात्रा यांनी केली आहे. मोबाइलची हेरगिरी झाली असेल, तर या प्रकरणी राहुल गांधी यांनी पोलिसात जाऊन तक्रार केली पाहिजे. ते का आपल्या फोनची फॉरेन्सिक तपासणी का करत नाहीत? त्यांच्या मोबाइलमध्ये असे काय आहे, ज्यामुळे ते तपासणीसाठी घाबरत आहेत?, अशी विचारणा भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे.

तसेच याआधी पेगॅससच्या माध्यमातून करण्यात आलेली हेरगिरी म्हणजे देशद्रोहच असल्याचे म्हणत काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला होता. 
 

Web Title: People worried by inflation and the government is engaged in tax collection says Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.