याचिकाकर्त्याने हजार रुपयांचा दंड राहुल गांधींना द्यावा, न्यायालयाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 12:52 PM2022-04-23T12:52:56+5:302022-04-23T12:53:41+5:30
भिवंडी न्यायालयात याप्रकरणी न्यायाधीश जे. व्ही. पालिवाल यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. २१ एप्रिलला भिवंडी न्यायालयात नियमित सुनावणीदरम्यान कुंटे यांनी पुढील तारीख मागितल्याने न्यायालयाने त्यांना दंड ठोठावला.
भिवंडी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१४ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) बदनामी केल्याचा दावा करणाऱ्या राजेश कुंटे यांना भिवंडी न्यायालयाने एक हजार रुपयांचा दंड ठाेठावला आहे. या खटल्यात साक्ष नाेंदविण्यास टाळाटाळ केल्याने कुंटे यांना हा दंड ठाेठावण्यात आला आहे. दंडाची ही रक्कम राहुल गांधी यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
भिवंडी न्यायालयात याप्रकरणी न्यायाधीश जे. व्ही. पालिवाल यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. २१ एप्रिलला भिवंडी न्यायालयात नियमित सुनावणीदरम्यान कुंटे यांनी पुढील तारीख मागितल्याने न्यायालयाने त्यांना दंड ठोठावला. तर २३ मार्चला याचिकाकर्ते कुंटे यांनी साक्ष न नोंदविता त्यास विलंब केल्याने ५०० रुपये दंड ठोठावला. ही रक्कम राहुल गांधी यांना देण्याचे आदेश दिले. पण, कुंटे यांनी पैसे भरले नसल्याची माहिती राहुल गांधी यांचे वकील ॲड. नारायण अय्यर यांनी दिली. तर, या खटल्याची पुढील सुनावणी १० मे रोजी होईल.