PM Modi Attack On Rahul Gandhi : ‘लंडनमध्ये भारताच्या लोकशाहीवर प्रश्न उपस्थित केले’, पीएम मोदींचा राहुल गांधींवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 07:14 PM2023-03-12T19:14:57+5:302023-03-12T19:35:49+5:30
PM Narendra Modi In Hubballi: कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
PM Modi In Hubballi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कर्नाटकातील हुबळी-धारवाडमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यानंतर जाहीर सभेलाही संबोधित केले. यावेळी त्यांनी राहुल गांधींवर नाव न घेता निशाणा साधला. काही लोक सतत भारताच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचे मोदी म्हणाले.
काय म्हणाले पीएम मोदी?
“भारत फक्त सर्वात मोठी लोकशाही नाही, तर लोकशाहीची जननी आहे. लंडनमध्ये भारताच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे दुर्दैवी आहे. काही लोक भारताच्या लोकशाहीवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. काही वर्षांपूर्वी मला लंडनमध्ये भगवान बसवेश्वरांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच आहे, पण लंडनमध्येच भारताच्या लोकशाहीवर प्रश्न होणे खूप मोठे दुर्दैव आहे,' अशी टीका मोदींनी केली.
#WATCH | "India is not only the largest democracy but is the mother of democracy...it's unfortunate that in London questions were raised about India's democracy...Some people are constantly questioning India's democracy...": PM Modi in Hubballi-Dharwad pic.twitter.com/PyBVul8rTg
— ANI (@ANI) March 12, 2023
ते पुढे म्हणाले की, 'भारताच्या लोकशाहीची मुळे आपल्या शतकानुशतके जुन्या इतिहासाने कोरलेली आहेत. जगातील कोणतीही शक्ती भारताच्या लोकशाही परंपरांना हानी पोहोचवू शकत नाही. भाजपचे डबल इंजिन सरकार कर्नाटकातील प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक गावाचा आणि प्रत्येक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आज या धारवाडच्या भूमीवर विकासाचा एक नवा प्रवाह येत आहे, जो हुबळी-धारवाडसह संपूर्ण कर्नाटकाच्या भविष्यात सिंचनाचे काम करेल.'
संबंधित बातमी- 'काँग्रेस मोदीची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहेत, पण...' PM मोदींचा विरोधकांवर घणाघात
कर्नाटकातील भाजप सरकारचे कौतुक
कर्नाटकातील भाजप सरकारचे कौतुक करताना मोदी म्हणाले की, '2014 पर्यंत अनेकांकडे पक्के घर नव्हते, शौचालये आणि रुग्णालयांची कमतरता होती. आम्ही प्रत्येक समस्येवर काम केले, लोकांचे जीवन सुखकर केले. आम्ही एम्सची संख्या तीन पट वाढवली आहे. सात दशकात देशात केवळ 380 वैद्यकीय महाविद्यालये होती, तर गेल्या 9 वर्षांत 250 नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडण्यात आली. कर्नाटकने आज कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत आणखी एक टप्पा गाठला आहे. आता सिद्धरुधा स्वामीजी स्टेशनला जगातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आहे.'
संबंधित बातमी- कर्नाटक काबीज करण्यासाठी भाजप सज्ज; मेगा रोड शोमध्ये PM मोदींवर फुलांचा वर्षाव..!