राहुल, केजरीवाल, पवार..; राजकीय वैर विसरुन INDIA आघाडीतील नेत्यांच्या PM मोदींना शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 05:11 PM2023-09-17T17:11:26+5:302023-09-17T17:11:44+5:30

PM Modi's 73rd Birthday: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस आहे. यानिमित्त मोदींवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

PM Modi Birthday: Rahul, Kejriwal, Nitish, Pawar; opposition leaders wishesh PM Modi | राहुल, केजरीवाल, पवार..; राजकीय वैर विसरुन INDIA आघाडीतील नेत्यांच्या PM मोदींना शुभेच्छा

राहुल, केजरीवाल, पवार..; राजकीय वैर विसरुन INDIA आघाडीतील नेत्यांच्या PM मोदींना शुभेच्छा

googlenewsNext

PM Modi's 73rd Birthday: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा 73वा वाढदिवस आहे. यानिमित्त मोदींवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सामान्य जनतेपासून, सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेही, पंतप्रधनांना शुभेच्छा देत आहेत. विशेष म्हणजे, विरोधकांच्या I.N.D.I.A. आघाडीतील नेत्यांनीही राजकीय वैर विसरुन पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. 

पीएम नरेंद्र मोदींचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला होता. दरम्यान, पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देणाऱ्या विरोधी नेत्यांमध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधीदेखील आहेत. राहुल गांधी पंतप्रधानांचे सर्वात मोठे टीकाकार आहेत. तरीपण, त्यांनी वैर विसरुन मोदींना शुभेच्छा दिल्या. 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीदेखील मोदींना शुभेच्छा दिल्या. त्यांनी X वर पोस्ट लिहिली, 'पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो.'

बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​नेते नितीश कुमार यांनीही पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या. विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नितीश कुमार यांनी पोस्ट केले, 'माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.'

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या. 'नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी तुमच्या चांगले आरोग्य, आनंद आणि समृद्धीची इच्छा करतो,' अशी पोस्ट त्यांनी केली.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवालदेखील पंतप्रधानांवर जोरदार टीका करतात. पण, त्यांनी आज मोदींना शुभेच्छा दिल्या. 'माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो.'

तृणमूल काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनीही पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय, केरळचे मुख्यमंत्री आणि डावे नेते पिनाराई विजयन आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनीही पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Web Title: PM Modi Birthday: Rahul, Kejriwal, Nitish, Pawar; opposition leaders wishesh PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.