'हे लोक मुघलांपेक्षा कमी नाहीत', राहुल आणि लालू कुटुंबावर पीएम मोदींचा घणाघात...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 03:32 PM2024-04-12T15:32:29+5:302024-04-12T15:33:32+5:30
PM Modi on INDIA Alliance : 'या नेत्यांना देशातील बहुसंख्य जनतेच्या भावनांचा आदर नाही.'
PM Modi on INDIA Alliance : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, अशा परिस्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोकाचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने प्रचार सभेतून विरोधकांवर निशाणा साधत आहेत. आजही त्यांनी विरोधकांच्या INDIA आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या वर्षी पवित्र श्रावन महिन्यात मटण खाल्ल्याचा आरोप करत पंतप्रधानांनी राहुल गांधी आणि लालू यादव यांच्यावर टीका केली. पंतप्रधान म्हणाले की, या नेत्यांना देशातील बहुसंख्य जनतेच्या भावनांची पर्वा नाही.
कांग्रेस और INDI गठबंधन को लोगों की भावनाओं से खिलवाड़ करने में मजा आता है।
— BJP (@BJP4India) April 12, 2024
सुनिए, प्रधानमंत्री श्री @narendramodi ने ऐसा क्यों कहा...
पूरा वीडियो देखें : https://t.co/eftumfimTWpic.twitter.com/AvF5P1t8p6
मुघलांशी तुलना
जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथील निवडणूक रॅलीत बोलताना पंतप्रधानांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओचा उल्लेख केला. त्या व्हिडिओत आरजेडी नेते लालू यादव आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी एकत्रित मटण खाताना दिसत आहेत. या दोन्ही नेत्यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदींनी त्यांची तुलना थेट मुघलांशी केली. तसेच, त्यांच्यावर 'देशातील बहुसंख्य लोकांना चिडवण्याचा' प्रयत्न केल्याचा आरोपही केला.
संबंधित बातमी- "जम्मू-काश्मीरला मिळेल पूर्ण राज्याचा दर्जा, लवकरच होतील विधानसभा निवडणुका"; मोदींची मोठी घोषणा
तेजस्वीच्या व्हिडिओवरही टोमणा
तेजस्वी यादव यांच्या व्हायरल व्हिडिओवरुन निर्माण झालेल्या वादावरही पीएम मोदींनी प्रतिक्रिया दिली. पीएम म्हणाले की, नवरात्रीत मांसाहार करणे दर्शविते की, त्यांना सामान्य लोकांच्या भावना दुखावायच्या आहेत. हे सर्व करून कोणाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहात? कायदा कोणालाही काहीही खाण्यापासून रोखत नाही, परंतु या लोकांचा हेतू दुसराच काही आहे. मुघलांना मंदिरे उद्ध्वस्त केल्याशिवाय समाधान मिळाले नाही. मुघलांप्रमाणे यांनाही देशातील जनतेला चिडवाल्यशिवाय समाधान मिळत नाही, अशी टीकाही पीएम मोदींनी केली.