PM Narendra Modi: 'भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी विरोधक एकत्र येताहेत', नरेंद्र मोदींचे टीकास्त्र...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 08:02 PM2022-09-01T20:02:53+5:302022-09-01T20:03:21+5:30
PM Narendra Modi In Kerala: 'ज्या राज्यांमध्ये भाजपची सरकारे,तिथे वेगाने विकास होतो.'
PM Modi In Kerala: पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) दोन दिवसांच्या केरळ (Kerala) दौऱ्यावर आहेत. यावेळी कोच्चीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मोदींचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यानंतर मोदींनी कोच्चीतील जनतेला संबोधित करताना विरोधकांवर (Opposition Parties) जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी विरोधकांवर भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी एकजूट होत असल्याचा आरोप केला.
मोदी म्हणाले की, ''जलद विकास न होणे आणि देशातील तरुणांचे स्वप्न अपूर्ण राहण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे भ्रष्टाचार. मी 15 ऑगस्टला बोललो होतो की, भ्रष्टारचारविरोधात आता निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली आहे. पण भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई सुरू झाल्यापासून देशात पोलरायजेशनदेखील सुर झाले आहे. भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी काही पक्ष मदत करत आहेत. देशातील नागरिकांनी अशा लोकांपासून सावध राहायला हवं.''
Opposition on the backfoot over action against corruption: PM Modi
— ANI Digital (@ani_digital) September 1, 2022
Read @ANI Story | https://t.co/8JW653IiLf#PMModi#KochiWelcomesModi#corruptionpic.twitter.com/ZCUbDN8e72
पंतप्रधान पुढे म्हणाले, "ज्या राज्यांमध्ये भाजपची सरकारे आहेत, तिथे वेगाने विकास होत आहे. संकटाच्या या काळात भारत आपल्या ठोस धोरणांमुळे आणि निर्णयांमुळे जगात स्थिरता आणि विकासाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलाय. काल आलेले जीडीपीचे आकडे भारताचा वेगवान विकास आणि वाढत्या रोजगाराच्या संधी दर्शवतात. गेल्या काही महिन्यांपासून जीएसटीचे आकडेही नवे रेकॉर्ड बनवत आहेत."
विरोधक का एकत्र येत आहेत?
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काल, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पाटण्यात मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि महाआघाडीच्या इतर नेत्यांची भेट घेतली. मात्र, नितीश यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या प्रश्नावर केसीआर यांनी वेळ आल्यावर निर्णय घेतला जाईल, असे पत्रकारांना सांगितले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही कोलकाता येथील जाहीर सभेतून विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. शरद पवार यापूर्वी अनेकदा विरोधी पक्षांना एकत्र येण्यास सांगत आहेत.