देशातील माता-भगिनींचे मला सुरक्षा कवच; मोदींचा राहुल गांधींवर पुन्हा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 09:56 AM2020-02-08T09:56:32+5:302020-02-08T09:56:42+5:30
बेरोजगारी वाढत राहिली तर सहा महिन्यांनी देशातील युवक पंतप्रधानांना काठ्यांनी चोप देऊन देशाबाहेर हाकलतील, या राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकारण चांगलेच तापले आहे. शुक्रवारी लोकसभेत यावरून मोठा गदारोळ झाला होता.
नवी दिल्ली - बेरोजगारी वाढत राहिली तर सहा महिन्यांनी देशातील युवक पंतप्रधान नरेंद्र मोदींना काठ्यांनी चोप देऊन देशाबाहेर हाकलतील, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले होते. त्याला लोकसभेत प्रत्युत्तर दिल्यानंतर मोदींनी आसाममधील कोकराझार येथे झालेल्या सभेत राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही नेते मला काठ्यांनी चोप देण्याच्या गोष्टी करतात. मात्र देशातील माता-भगिनींच्या आशीर्वादामुळे माझा बचाव होईल. आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहात. त्यामुळे माझा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. ज्या व्यक्तीला एवढ्या मोठ्या प्रमाणात माता-भगिनींची सुरक्षा मिळाली, त्याच्यावर कितीही काठ्यांचा मारा झाला तरी त्याच काहीही वाकड होणार नाही, असंही मोदी म्हणाले.
आज आप इतनी बड़ी तादाद में जब आशीर्वाद देने आये हैं, तो मेरा विश्वास और बढ़ गया है।
— BJP (@BJP4India) February 7, 2020
कभी-कभी लोग मोदी को डंडा मारने की बातें करते हैं।
जिस मोदी को इतनी बड़ी मात्रा में माताओं-बहनों का सुरक्षा कवच मिला हो, उस पर कितने ही डंडे गिर जाएं, उसको कुछ नहीं होता: पीएम #BodoPeaceAccordpic.twitter.com/E7rgviAuOG
बेरोजगारी वाढत राहिली तर सहा महिन्यांनी देशातील युवक पंतप्रधानांना काठ्यांनी चोप देऊन देशाबाहेर हाकलतील, या राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकारण चांगलेच तापले आहे. शुक्रवारी लोकसभेत यावरून मोठा गदारोळ झाला होता.