"लोकसभेत एक, राज्यसभेत एक... ही अशी विभागलेली, कन्फ्यूज काँग्रेस देशाचं भलं करू शकत नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 05:21 PM2021-02-10T17:21:23+5:302021-02-10T17:33:41+5:30
PM Narendra Modi Speech in Lok Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत शेतकरी आंदोलनावर भूमिका मांडली आहे. तसेच काँग्रेसला सणसणीत टोला लगावला आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्याचं आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत शेतकरी आंदोलनावर भूमिका मांडली आहे. याच दरम्यान त्यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तसेच काँग्रेसला सणसणीत टोला लगावला आहे. कन्फ्यूज काँग्रेस देशाचं भलं करू शकत नाही असं म्हणत मोदींनी हल्लाबोल केला आहे. "एवढी वर्षं देशावर राज्य केलेली पार्टी... पण लोकसभेत एक, राज्यसभेत एक. ही अशी विभागलेली, कन्फ्यूज काँग्रेस देशाचं भलं करू शकत नाही'' असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
माझ्या भाषणाने काँग्रेस उघडी पडेल अशी भीती असल्याचं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे. काँग्रेसची लोकसभेत एक भूमिका, तर राज्यसभेत दुसरी भूमिका, इतकी विभागलेली आणि कन्फ्यूज पार्टी मी कधी पाहिली नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांवर मोदी बोलताना विरोधकांनी मोठा गदारोळ केला. तसेच कोरोनावरही भाष्य केलं आहे. कोरोना प्रकोपात जग हलले, परंतू आम्ही वाचलो. देवाच्या कृपेने आम्ही वाचलो असे मनीष तिवारी म्हणाले होते.
#WATCH LIVE: PM Modi replies in Lok Sabha to the Motion of Thanks on President’s Address.(Source: Lok Sabha TV) https://t.co/ilqOGpGGzH
— ANI (@ANI) February 10, 2021
देवाच्या कृपेने आम्ही कोरोनापासून वाचलो; नरेंद्र मोदींचे 'आश्चर्यकारक' वक्तव्य
मी म्हणतो डॉक्टर, नर्सच्या रुपात देव आला होता. डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी मृत्यूशी खेळत होते. मुलांना घरी ठेवून येत होते. त्यांच्या रुपात देव पावला असे मोदी यांनी सांगितले. परदेशांमध्ये लाखो-करोडो डॉलर तिजोरीत पडून होते. त्यांना त्यांचे नागरिक वाचविता आले नाहीत. पण आपण आत्मनिर्भर झालो, असे मोदी म्हणाले. आधारविरोधात अनेक जण न्यायालयात गेले होते. मी आज यावर बोलणार आहे. आधारमुळे आज कोरोनाकाळात आम्ही जनधन, शेतकरी, पदपथवाले अशा अनेकांच्या खात्यात मदत पोहोचवली. आज आपल्याकडे विक्रमी जीएसटी जमा झाला आहे. ट्रॅक्टर, गाड्यांचा विक्रमी सेल झाला आहे. तीन कृषी कायदे आणले, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले.
PM Modi Speech LIVE: कृषी कायद्यांत अडथळे आणण्याचा प्रयत्न 'सोची समझी रणनीती'; मोदींनी सांगितलं का घातला जातोय गोंधळ?#NarendraModihttps://t.co/cFTJt7WWXF
— Lokmat (@MiLOKMAT) February 10, 2021