माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 75वी जयंती, मोदींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 08:34 AM2019-08-20T08:34:17+5:302019-08-20T08:37:11+5:30
देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 75वी जयंती आहे.
नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 75वी जयंती आहे. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांनी नवी दिल्लीतील राजघाट येथे जाऊन त्यांच्या समाधीस्थळावर आदरांजली वाहिली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही यावेळी राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल हे यावेळी उपस्थित होते.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी टेलिकॉम, आयटी, पंचायत राजसहीत अन्य कित्येक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. 1984 पासून ते 1989 पर्यंत राजीव गांधी यांनी पंतप्रधानपद भूषवले आहे. राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईमध्ये झाला होता आणि 21 मे, 1991 रोजी त्यांची हत्या करण्यात आली. तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे 21 मे 1991 रोजी महिला सुसाईड बॉम्बरद्वारे एलटीटीईच्या दहशतवाद्यांनी राजीव गांधी यांची हत्या केली होती.
Delhi: Congress Interim President Sonia Gandhi, Former Prime Minister Dr Manmohan Singh, Rahul Gandhi, & Priyanka Gandhi Vadra pay tributes to former Prime Minister Rajiv Gandhi on his 75th birth anniversary. pic.twitter.com/3tcPgY4u3K
— ANI (@ANI) August 20, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त काँग्रेस या आठवड्यात पूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. राजीव गांधी यांचे योगदान, विविध क्षेत्रांतील त्यांची कामगिरी यावर यानिमित्ताने प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. काँग्रेसने मंगळवारी (20 ऑगस्ट) दिल्लीस्थित पक्ष मुख्यालयात एक स्मृती कार्यक्रम आयोजित केला आहे.
Prime Minister Narendra Modi tweets, "Tributes to our former Prime Minister Shri Rajiv Gandhi on his birth anniversary." pic.twitter.com/tqTKMwkKMs
— ANI (@ANI) August 20, 2019
राजीव गांधींच्या योगदानाला राहुल यांनी दिला उजाळा
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपले वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील योगदानावर भाष्य केले आहे. या आठवड्यात आम्ही राजीव गांधी यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त पूर्ण देशात स्मृती कार्यक्रमाचे आयोजन करणार आहोत. आठवड्यात दररोज वडिलांच्या उल्लेखनीय कामगिरीवर लक्ष वेधून घेणार आहे असं म्हटलं आहे. सोमवारी आयटी क्षेत्राबाबत माहिती देत त्यांनी 55 सेकंदांची एक क्लिप जारी केली.
Delhi: Congress leaders Ghulam Nabi Azad, Bhupinder Singh Hooda, & Ahmed Patel pay tributes to former Prime Minister Rajiv Gandhi on his 75th birth anniversary. pic.twitter.com/ebBkeXNBlW
— ANI (@ANI) August 20, 2019
Delhi: Former President Pranab Mukherjee pays tribute to former Prime Minister Rajiv Gandhi on his 75th birth anniversary. pic.twitter.com/HglFQ0G4x2
— ANI (@ANI) August 20, 2019
इंदिरा गांधींवर वेब सिरीज
‘द लंच बॉक्स’ आणि ‘फोटोग्राफ’मुळे चर्चेत आलेले रितेश बत्रा आता माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित वेब सिरीजचे दिग्दर्शन करणार आहेत. अभिनेत्री विद्या बालनची ही पहिली वेब सिरीज आहे. ‘इंदिरा : इंडियाज मोस्ट पॉवरफुल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकावर ही वेब सिरीज आधारित आहे.