"जनता अभिमन्यू नाही तर..."; राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या योजनांसंदर्भात सोशल मीडियावर हे काय लिहिलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 02:07 PM2024-07-30T14:07:04+5:302024-07-30T14:08:02+5:30
नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत सर्वसामान्य भारतीयांचे 'रिकामे खिसे'ही कापले जात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
काँग्रेस खासदार तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत सर्वसामान्य भारतीयांचे 'रिकामे खिसे'ही कापले जात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी “उद्योगपती मित्रांचे 16 लाख कोटी रुपये माफ केलेल्या सरकारने ‘मिनिमम बॅलेन्स’देखील मेन्टेन करू न शकणाऱ्या गरीब भारतीयांकडून 8500 कोटी रुपये वसूल केले आहेत,“ असे लिहिले आहे.
राहुल गांधी यांनू पुढे लिहिले, "दंडव्यवस्था' हे मोदींच्या चक्रव्यूहाचे द्वार आहे, याच्या माध्यमाने सर्वसामान्य भारतीयांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, भारतीय जनता अभिमन्यू नही, अर्जुन आहे. ती चक्रव्यूह भेदून आपल्या प्रत्येक अत्याचाराचे उत्तर देणे जाणते."
नरेंद्र मोदी के अमृतकाल में आम भारतीयों की ‘खाली जेब’ भी काटी जा रही है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 30, 2024
मित्र उद्योगपतियों के 16 लाख करोड़ माफ कर देने वाली सरकार ने ‘मिनिमम बैलेंस’ तक मेंटेन न कर पा रहे गरीब भारतवासियों से 8500 करोड़ रुपए वसूल लिए हैं।
‘जुर्माना तंत्र’ मोदी के चक्रव्यूह का वो द्वार है जिसके…
...म्हणून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला -
खरे तर, राहुल गांधी यांनी एक अहवाल आल्यानंतर मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. या अहवालात, अकाउंटमध्ये मिनिमम बॅलेन्स मेंटेन करू न शकणाऱ्या लोकांकडून गेल्या पाच वर्षांत पेनल्टीच्या माध्यमाने एकूण 8500 कोटी रुपये कमावल्याचे म्हणण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांत सरकारी बँकांची मिनिमम बॅलेन्स पेनल्टीची रक्कम 38 टक्क्यांनी वाढली आहे. अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.