'प्रकाशक खोटे बोलत आहे, पुस्तक 'Amazon'वर उपलब्ध', नरवणेंच्या पुस्तकावर राहुल गांधींचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:25 IST2026-02-10T13:07:11+5:302026-02-10T13:25:53+5:30

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नरवणे यांच्या पुस्तकाबद्दल आणखी एक महत्त्वाचे सत्य उघड केले आहे. त्यांनी पेंग्विन प्रकाशन संस्थेवर खोटे बोलण्याचा आरोप केला. नरवणे स्वतःच्या पुस्तकाला खोटे कसे म्हणू शकतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

'Publisher is lying, book available on Amazon', Rahul Gandhi's big statement on Naravane's book | 'प्रकाशक खोटे बोलत आहे, पुस्तक 'Amazon'वर उपलब्ध', नरवणेंच्या पुस्तकावर राहुल गांधींचे मोठे विधान

'प्रकाशक खोटे बोलत आहे, पुस्तक 'Amazon'वर उपलब्ध', नरवणेंच्या पुस्तकावर राहुल गांधींचे मोठे विधान

माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकाभोवतीचा वाद वाढत चालला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या पुस्तकाबाबत केंद्र सरकारला प्रत्युत्तर दिले आहे. पुस्तक प्रकाशक पेंग्विन खोटे बोलत आहेत. हे पुस्तक २०२३ मध्ये प्रकाशित झाले होते आणि ते ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनवर उपलब्ध आहे. पेंग्विन आणि नरवणे दोघांनीही पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध असल्याबद्दल ट्विट केले आहे.

धक्कादायक! एकाच घरात पाच जणांचे मृतदेह सापडले, घटनास्थळी फक्त दुधाचे ग्लास होते

माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकाच्या कथित प्रसारणाची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निदर्शनास आणून दिले. यामध्ये त्यांनी नरवणे यांनी २०२३ मध्ये त्यांचे पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध असल्याबद्दल ट्विट केले होते, यामध्ये म्हटले होते की, "माझे पुस्तक आता उपलब्ध आहे; खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा." याचा अर्थ असा की नरवणे खोटे बोलत आहेत किंवा पेंग्विन पब्लिकेशन्स खोटे बोलत आहेत.

पुस्तक दोन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध
 
हे पुस्तक दोन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. गांधी म्हणाले,"मला वाटत नाही की माजी लष्करप्रमुख खोटे बोलतील. पेंग्विनचा दावा आहे की हे पुस्तक प्रकाशित झालेले नाही, जरी ते ऑनलाइन उपलब्ध आहे. मला पेंग्विनपेक्षा नरवणे यांच्यावर जास्त विश्वास आहे, पण तुम्हाला नरवणे यांच्यापेक्षा पेंग्विनवर जास्त विश्वास आहे का? नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात काही विधाने केली आहेत जी भारत सरकार आणि पंतप्रधानांसाठी गैरसोयीची आहेत. आता, लोकांना स्वतः ठरवू द्या की कोण खरे बोलत आहे आणि कोण खोटे बोलत आहे, पेंग्विन की नरवणे.", असंही राहुल गांधी म्हणाले.

निशिकांत दुबे यांनी कारवाईची मागणी केली

खासदार निशिकांत दुबे म्हणाले, पेंग्विन प्रकाशनाने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की हे पुस्तक प्रकाशित झालेले नाही, ते कारवाई करतील. संसदेचे स्वतःचे नियम आहेत आणि कोणालाही सभागृहाची दिशाभूल करण्याची परवानगी नाही. जर प्रकाशक असा दावा करत असेल की हे पुस्तक प्रकाशित झालेले नाही, तर ते कोणते पुस्तक दाखवत आहेत? मी अध्यक्षांना राहुल गांधी आणि देशाचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची विनंती करतो, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title : राहुल गांधी: नरवणे की किताब अमेज़न पर उपलब्ध, प्रकाशक झूठ बोल रहा है।

Web Summary : राहुल गांधी का दावा है कि जनरल नरवणे की किताब अमेज़न पर उपलब्ध है, जो प्रकाशक का खंडन करती है। उन्होंने पेंग्विन से ज्यादा नरवणे पर भरोसा जताया और सवाल किया कि क्या प्रकाशक सरकार के लिए असुविधाजनक सच्चाई छुपा रहा है।

Web Title : Rahul Gandhi: Naravane's book available on Amazon, publisher is lying.

Web Summary : Rahul Gandhi claims General Naravane's book is available on Amazon, contradicting the publisher. He trusts Naravane more than Penguin, questioning if the publisher is hiding inconvenient truths for the government.