"त्यावेळी काँग्रेस नेते सुट्टीवर होते"; अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा

By देवेश फडके | Published: February 28, 2021 02:42 PM2021-02-28T14:42:21+5:302021-02-28T14:46:50+5:30

देशातील पाच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी कराइकल येथे एका जनसभेला संबोधित केले. यावेळी अमित शहा यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत पुदुच्चेरीमध्ये भाजप सत्ता स्थापन करेल, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.

puducherry assembly election 2021 amit shah slams rahul gandhi over fisheries ministry | "त्यावेळी काँग्रेस नेते सुट्टीवर होते"; अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा

"त्यावेळी काँग्रेस नेते सुट्टीवर होते"; अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा

Next
ठळक मुद्देअमित शहा यांचा राहुल गांधींवर हल्लाबोलमत्स्य मंत्रालयावरून केलेल्या टीकेवर प्रत्युत्तरपुदुच्चेरीमध्ये भाजपचेच सरकार येईल, असा अमित शहांना विश्वास

कराइकल : देशातील पाच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी कराइकल येथे एका जनसभेला संबोधित केले. यावेळी अमित शहा यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत पुदुच्चेरीमध्ये भाजप सत्ता स्थापन करेल, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. (puducherry assembly election 2021 amit shah slams rahul gandhi over fisheries ministry)

राहुल गांधी यांनी वेगळ्या मत्स्य मंत्रालयावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली होती. याला अमित शहा यांनी राहुल गांधींवर जोरदार पलटवार केला आहे. सन २०१९ मध्ये मत्स्य मंत्रालयाची स्थापन करण्यात आली आहे. तेव्हा काँग्रेस नेते सुट्टीवर होते, अशी टीका अमित शहा यांनी केली.

उद्यापासून ४५ वर्षांवरील व्यक्तींनाही मिळणार कोरोना लस; मात्र 'या' गोष्टी बंधनकारक

खासदाराला माहिती नसणे दुर्दैव

ज्या पक्षाचा नेता गेले चार टर्म लोकसभेत खासदार आहे, त्यांना दोन वर्षांपूर्वीपासून देशात मत्स्य मंत्रालयाचा कारभार सुरू झाला आहे, याची कल्पनाही असू नये, याचे आश्चर्य वाटते. असा पक्ष आणि नेते पुदुच्चेरीचे कल्याण कसे करणार, असा प्रश्न अमित शहा यांनी यावेळी उपस्थित केला. 

पुदुच्चेरीत भाजपचेच सरकार

माझ्या राजकीय अनुभवावरून सांगतो की, आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय होऊन भाजप सरकार स्थापन करेल, असा दावा अमित शहा यांनी यावेळी बोलताना केला. पुदुच्चेरी अतिशय पवित्र भूमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुदुच्चेरीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजप नेहमीच प्रयत्नशील आहे. मत्स्य मंत्रालयातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फायदा पुदुच्चेरीच्या जनतेला होईल, असेही अमित शहा म्हणाले.

दरम्यान, आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत पुदुच्चेरी, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. पदुच्चेरी विधानसभेसाठी ०६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, ०२ मे रोजी मतमोजणी होणार आहे. 

 

Web Title: puducherry assembly election 2021 amit shah slams rahul gandhi over fisheries ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.