महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या; राहुल गांधींचं टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 01:12 PM2019-11-25T13:12:01+5:302019-11-25T13:14:47+5:30
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे.
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या सरकारला विधानसभेत तोंडघशी पाडण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. लोकसभेतही या सत्तासंघर्षाचा परिणाम पाहायला मिळाला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाल्याचं राहुल यांनी म्हटलं आहे.
लोकसभेत सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्रातील राजकारणावरुन राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. 'मला सभागृहामध्ये काही प्रश्न विचारायचे होते. मात्र आता त्याला काही अर्थ नाही कारण महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधीपक्षाच्या नेत्यांनी 'संविधानची हत्या बंद करा, बंदा करा' अशी घोषणाबाजी केली आहे.
Congress leader Rahul Gandhi in Lok Sabha: I wanted to ask a question in the House but it doesn't make any sense to ask a question right now as democracy has been murdered in #Maharashtra. pic.twitter.com/eZUCONJfop
— ANI (@ANI) November 25, 2019
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. राज्यातील सत्तासंघर्षावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रियंका गांधी यांनी सोमवारी (25 नोव्हेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपावर टीका केली आहे. 'जनादेशाच्या खुल्या अपहरणाच्या युगात आपण पोहोचलो आहोत की काय?' असा सवाल प्रियंका यांनी केला आहे. 'भाजपाने महाराष्ट्रात देशाची राज्यघटना व घटनात्मक संस्थांना ठेंगा दाखवून कर्नाटकातील सत्तेच्या खेळाची पुनरावृत्ती सुरू केली आहे, असं टीव्हीवर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात 12 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्यासाठी भाजपा सरकारच्या खिशातून कधी मदत निघाली नाही' असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Sonia Gandhi leads Congress protest on the Maharashtra issue in Parliament premises
— ANI Digital (@ani_digital) November 25, 2019
Read @ANI Story | https://t.co/qOLNQdEMWgpic.twitter.com/nuXnDJbaGz
महाराष्ट्राच्या राजकीय नाट्याला वेगळं वळण लागलं असून, आता हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेनं याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर सुनावणी झाली असता सर्वोच्च न्यायालय उद्या त्यावर निर्णय देणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या 54 आमदारांचं पत्र देऊन अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे ते पत्र ग्राह्य धरू नये, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. आमच्याकडे 162 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना 162 आमदारांच्या समर्थनाचं पत्र दिलेलं आहे.
Rajya Sabha has been adjourned till 2 pm amidst sloganeering by the MPs of the opposition, over the issue of Maharashtra. pic.twitter.com/zXUyxY20mF
— ANI (@ANI) November 25, 2019
महाराष्ट्रात राज्यपालांच्या समोर आमच्या 162 आमदारांचं समर्थन सिद्ध करू. राज्यपालांसमोर आमची परेड करण्याची तयारी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह अपक्षांच्या सह्यांची यादी सोबत जोडलेली आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे 162 हे पुरेसं संख्याबळ आहे. बहुमताला 144 आमदारांची गरज आहे. त्यामुळे तात्काळ आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्यात यावं, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे.