भारतात शिक्षण आणि रोजगारनिर्मितीऐवजी फक्त तिरस्कार पसरवला जातो आहे, राहुल गांधी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 08:49 AM2018-01-09T08:49:31+5:302018-01-09T08:51:13+5:30

भारतात शिक्षणाचा प्रसार होणं व नोकरीच्या संधी निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. पण सध्या प्रत्यक्षात मात्र फक्त तिरस्कार पसरविण्याचं काम सुरू आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

Rahul gandhi addresses global organisation of people of indian origin in bahrain | भारतात शिक्षण आणि रोजगारनिर्मितीऐवजी फक्त तिरस्कार पसरवला जातो आहे, राहुल गांधी यांची टीका

भारतात शिक्षण आणि रोजगारनिर्मितीऐवजी फक्त तिरस्कार पसरवला जातो आहे, राहुल गांधी यांची टीका

Next
ठळक मुद्दे भारतात शिक्षणाचा प्रसार होणं व नोकरीच्या संधी निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. पण सध्या प्रत्यक्षात मात्र फक्त तिरस्कार पसरविण्याचं काम सुरू आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. बहरीनमध्ये सोमवारी झालेल्या भारतीय वंशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

बहरीन- भारतात शिक्षणाचा प्रसार होणं व नोकरीच्या संधी निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. पण सध्या प्रत्यक्षात मात्र फक्त तिरस्कार पसरविण्याचं काम सुरू आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी हे सध्या बहरीन दौऱ्यावर आहेत. बहरीनमध्ये सोमवारी झालेल्या भारतीय वंशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. वर्षभरात नोकरीच्या संधी निर्माण न होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटलं आहेत. गेल्या आठ वर्षातला निचांकी आकडा या सरकारने रोजगारनिर्मितीत गाठला आहे. त्यामुळे खरं आव्हान या संधी निर्माण करणं आणि शिक्षणाचा प्रसार करणं आहे. पण, भारत सरकारकडून लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातं आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे. 





 

जनतेत फूट पाडणं हाच या मोदी सरकारपुढचा अजेंडा दिसतो आहे असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. आपल्या सगळ्यांच्या मायदेशावर काय संकट आलं आहे त्याची कल्पना देण्यासाठी मी इथे उभा आहे असंही राहुल गांधी यांनी म्हंटलं. 



 

बहरीन येथिल कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी गुजरात विधानसभा निवडणूक निकालाचा मुद्दाही उपस्थित केला. निकालाला उद्देशून बोलताना राहुल गांधी यांनी भाजपावर सडकून टीका केली. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो आणि तिथून ते कसेबसे वाचले आहेत, गुजरातमध्ये त्यांना निसटता विजय मिळाला आहे, असं राहुल गांधी यांनी म्हंटलं. 



 

बहरीनमध्ये आल्यावर राहुल गांधी यांचं पीपल ऑफ इंडियन ऑरिजनच्या सदस्यांनी भव्य स्वागत केलं. भारतीय वंशाच्या नागरिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याआधी राहुल गांधी यांनी प्रिन्स शेख सलमान बिन हमद अल खलीफा यांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पंडित नेहरूंची काही पुस्तकंही खलीफांना भेट दिली.

Web Title: Rahul gandhi addresses global organisation of people of indian origin in bahrain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.