हरियाणात काँग्रेस आणि आप एकत्र निवडणूक लढवणार? सूत्रांकडून समोर आली 'ही' मोठी बातमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 11:47 AM2024-09-03T11:47:50+5:302024-09-03T11:48:44+5:30

Haryana Assembly Election 2024 : राज्यात काँग्रेसकडून भूपेंद्र सिंग हुडा, दीपेंद्र हुडा, रणदीप सुरजेवाला आणि कुमारी सेलजा यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात आहे.

rahul gandhi advocates alliance of aap and congress in haryana assembly election, says- ighting separately will cause harm | हरियाणात काँग्रेस आणि आप एकत्र निवडणूक लढवणार? सूत्रांकडून समोर आली 'ही' मोठी बातमी 

हरियाणात काँग्रेस आणि आप एकत्र निवडणूक लढवणार? सूत्रांकडून समोर आली 'ही' मोठी बातमी 

Haryana Assembly Election 2024: नवी दिल्ली : हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. यादरम्यान, काँग्रेसने हरियाणात सत्ता मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. अशातच हरियाणा काँग्रेसमध्ये निवडणुकीपूर्वीच भूपेंद्र सिंह हुड्डा, कुमारी शैलजा आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांचा समावेश असलेल्या काही बड्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षासोबत (आप) युती करणे फायदेशीर ठरू शकते, असा विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. राहुल गांधींच्या या मुद्द्यावर सर्व नेत्यांचे एकमत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हरियाणासाठी CEC बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपले मत व्यक्त करताना राहुल गांधी म्हणाले की, राज्यात आम आदमी पक्षासोबत एकत्र निवडणूक लढल्याने काँग्रेसला फायदा होईल आणि दोन्ही पक्ष वेगळे लढले तर नुकसान सहन करावे लागू शकते. या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याआधी हरियाणाच्या सर्व ९० विधानसभा जागांवर काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल, असे पक्षाचे नेते सतत सांगत होते.  

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून हरियाणा काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू आहे. राज्यातील पक्षीय राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भूपेंद्र सिंग हुड्डा, कुमारी शैलजा आणि रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. दरम्यान, हरियाणा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर पक्षाच्या कोणत्याही खासदाराला मुख्यमंत्री बनवले जाऊ शकते, असे विधानही काँग्रेसकडून आले आहे. राज्यात काँग्रेसकडून भूपेंद्र सिंग हुडा, दीपेंद्र हुडा, रणदीप सुरजेवाला आणि कुमारी सेलजा यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात आहे.

Web Title: rahul gandhi advocates alliance of aap and congress in haryana assembly election, says- ighting separately will cause harm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.