राहुल गांधींच्या विमानात घातपात झाल्याचा संशय; वैमानिकाविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 02:44 AM2018-04-27T02:44:54+5:302018-04-27T02:44:54+5:30

प्रवासादरम्यान १०.४५च्या सुमारास विमान अचानक एका बाजूला झुकले आणि खाली आले.

Rahul Gandhi aircraft snag LIVE UPDATES FIR filed against pilots | राहुल गांधींच्या विमानात घातपात झाल्याचा संशय; वैमानिकाविरुद्ध गुन्हा दाखल

राहुल गांधींच्या विमानात घातपात झाल्याचा संशय; वैमानिकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी दिल्लीहून हुबळी येथे जात असताना त्यांच्या विमानात उद्भवलेल्या संशयास्पद तांत्रिक बिघाडांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी संबंधित वैमानिकाविरुद्ध गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी काल दिल्लीहून विमानाने हुबळी येथे गेले होते. त्यावेळी विमानात काही तांत्रिक बिघाड उद्भवले. यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत काँग्रेस पक्षाकडून गुरूवारी रात्री उशीरा कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे संबंधित वैमानिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर विमान ताब्यात घेऊन पायलटची चौकशी सुरू करण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. 

या विमानातून प्रवास करणाऱ्या कौशल विद्यार्थी यांनी आपल्या तक्रारीत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. मी दिल्लीतून कर्नाटकातील हुबळीला जाणाऱ्या विशेष विमानाने प्रवास केला. माझ्यासोबत अन्य ४ प्रवासी होते. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, रामप्रीत, राहुल रवी, राहुल गौतम (एसपीजी अधिकारी) या चौघांचा समावेश होता. विमानाने सकाळी साधारण ९.२० च्या सुमारास दिल्ली विमानतळावरून उड्डाण घेतले. निर्धारित वेळेनुसार सकाळी ११.४५ वाजता हे विमान हुबळी विमानतळावर उतरणे अपेक्षित होते. मात्र, या प्रवासादरम्यान अनेक अनपेक्षित आणि संशयास्पद प्रकार घडले. प्रवासादरम्यान १०.४५च्या सुमारास विमान अचानक एका बाजूला झुकले आणि खाली आले. यादरम्यान, विचित्र आवाजही झाला. विमानातील 'ऑटो पायलट मोड' निकामी झाल्याचेही त्यावेळी लक्षात आले. हवामान सामान्य असतानाही असा प्रकार घडल्याने सगळेच चक्रावून गेले. तसेच विमान हुबळीजवळ गेल्यानंतर विमान उतरवण्याचे दोन प्रयत्न अपयशी ठरले. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात विमान उतरले. हा सगळाच प्रकार संशयास्पद होता, असे कौशल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. परंतु, सुदैवाने या घटनेत विमानातील कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. या सगळ्या प्रकारानंतर राहुल गांधी आपल्या पुढच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.









 

 

Web Title: Rahul Gandhi aircraft snag LIVE UPDATES FIR filed against pilots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.