'आंध्र प्रदेशच्या लोकांना दिलेलं आश्वासन मोदींनी पूर्ण केलं नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 11:14 AM2019-02-11T11:14:29+5:302019-02-11T12:17:33+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नायडूंची भेट घेतली आहे. तसेच काँग्रेसने या उपोषणाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे.
नवी दिल्ली - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी सोमवारी (11 फेब्रुवारी) दिल्लीमध्ये एकदिवसीय उपोषणाला सुरुवात केली आहे. महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नायडूंची भेट घेतली आहे. तसेच काँग्रेसने या उपोषणाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी 'मी आंध्र प्रदेशच्या लोकांसोबत आहे. हे कोणत्या प्रकारचे पंतप्रधान आहेत ? आंध्र प्रदेशच्या लोकांना दिलेलं आश्वासन मोदींनी पूर्ण केलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास गमावला आहे. जिथे जातात तिथे ते खोटं बोलतात. मोदींनी राफेल विमान खरेदीत घोटाळा केला. चौकीदार चोर है' असं म्हणत मोदींवर जोरदार टीका केली आहे.
Congress President Rahul Gandhi: I stand with the people of Andhra Pradesh. What kind of a PM is he? He did not fulfill the commitment made to the people of Andhra Pradesh. Mr Modi, tells a lie wherever he goes. He has got no credibility left. pic.twitter.com/LdW5923O4T
— ANI (@ANI) February 11, 2019
चंद्राबाबू नायडू यांनी 'आज आपण येथे सगळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी गोळा झालो आहोत. आपल्या आंदोलनाच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे गेले होते. याची गरजच काय असं मला विचारायचं आहे', असा प्रश्च विचारला आहे. तसेच 'जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्या कशा पूर्ण करायच्या आम्हाला चांगलंच माहीत आहे. हा आंध्रप्रदेशातील लोकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जेव्हा कधी आमच्या स्वाभिमानावर हल्ला होईल आम्ही सहन करणार नाही. मी सरकारला आणि खासकरुन पंतप्रधानांना चेतावणी देत आहे की एकट्यावर हल्ला करणं थांबवा', असा इशारा चंद्राबाबू नायडू यांनी दिला आहे.
Delhi: Congress President Rahul Gandhi at the Andhra Pradesh CM N Chandrababu Naidu's day-long hunger strike against the central government. pic.twitter.com/rKCjz9wz2l
— ANI (@ANI) February 11, 2019
पंतप्रधान मोदींना 'ना घर, ना मुलगा', पत्नीचं नाव घेत चंद्राबाबूंचा मोदींवर पलटवार
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली होती. आपल्यावर केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देताना चंद्राबाबू यांनी मोदींना पत्नी जशोदाबेन यांच्यावरुन लक्ष्य केलं होतं. तुम्ही तुमच्या पत्नीला दूर केलं, तुमच्या कुटुंबाबद्दल तुमच्या मनात थोडातरी आदर आहे का ? मी माझ्या कुटुंबाचा सन्मान करतो, माझ्या कुटुंबावर माझं प्रेम आहे, अशा शब्दात चंद्राबाबू यांनी मोदींवर कौटुंबिक वादातून टीका केली होती.
आंध्रला विशेष राज्याचा दर्जा द्या; चंद्राबाबूंचे एकदिवसीय उपोषण सुरूhttps://t.co/ozyVSdZZut#ChandrababuNaidu
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 11, 2019
दिल्लीत चंद्राबाबू नायडूंचे उपोषण, आंध्र भवनाबाहेर एकानं केली आत्महत्या https://t.co/dU5zv5GfWU#AndhraPradeshBhawan#ChandrababuNaidu@narendramodi
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 11, 2019