राहुल गांधींची मोठी घोषणा! येत्या २४ तासांत काँग्रेस ५ निवडणूक आश्वासने पूर्ण करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 02:23 PM2023-05-20T14:23:58+5:302023-05-20T14:24:31+5:30

कर्नाटकात सिद्धरामय्या आणि डीके शिकुमार यांचा शपथविधी सोहळा पार पडला.

rahul gandhi announced fulfill five promise in karnataka within 2 hours | राहुल गांधींची मोठी घोषणा! येत्या २४ तासांत काँग्रेस ५ निवडणूक आश्वासने पूर्ण करणार

राहुल गांधींची मोठी घोषणा! येत्या २४ तासांत काँग्रेस ५ निवडणूक आश्वासने पूर्ण करणार

googlenewsNext

कर्नाटकातील नवीन काँग्रेस सरकारच्या शपथविधी समारंभात सिद्धरामय्या यांनी शनिवारी कर्नाटकचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. येथील कांतीरवा स्टेडियमवर हा सोहळा पार पडला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धरामय्या यांना पदाची शपथ दिली. सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्री म्हणून ही दुसरी टर्म आहे. यापूर्वी ते २०१३ ते २०१८ या काळात या पदावर होते. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी हात जोडून गर्दीचे स्वागत केले. नंतर राहुल गांधीही व्यासपीठावर गेले. शपथविधी सोहळ्याला सुमारे एक लाख लोक उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर मंचावर आलेल्या राहुल गांधींनी लोकांना संबोधित करताना सांगितले की, कर्नाटक सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक येत्या दोन तासांत होणार असून, त्यांनी दिलेल्या पाच आश्वासनांची घोषणा करणार आहे. 

राहुल गांधी यांनी व्यासपीठावर येऊन काँग्रेसच्या निमंत्रणावर आलेल्या सर्व विरोधी नेत्यांची नावे घेतली आणि त्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, मी कर्नाटकातील जनतेचे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापासून आभार मानतो. तुम्ही काँग्रेस पक्षाला पूर्ण पाठिंबा दिला.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासन वाचली आणि ती पूर्ण करण्याची घोषणा केली. कर्नाटकच्या नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक एक-दोन तासांत होईल, असंही ते म्हणाले. यातील पाच आश्वासनावर कायदे बनतील, असंही ते म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की, कर्नाटक निवडणुकीपूर्वी काँग्रेसने ५ हमीभावाचे आश्वासन दिले होते. या आश्वासनांमध्ये सर्व घरांना २०० युनिट मोफत वीज (गृह ज्योती), प्रत्येक घरातील महिला प्रमुखाला (गृहलक्ष्मी) २००० रुपये मासिक मदत, दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील प्रत्येक सदस्याला १० किलो मोफत अन्न यांचा समावेश आहे. बेरोजगार पदवीधर तरुणांना दरमहा रु. ३,००० आणि बेरोजगार पदविकाधारकांना (दोन्ही १८-२५ वयोगटातील) (युवा निधी) दोन वर्षांसाठी रु. १,५०० आणि सार्वजनिक वाहतूक बसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवास.

राहुल गांधींनी दिलेल्या पाच आश्वासनांची पूर्तताही केली जात असल्याचे काँग्रेस नेते म्हणाले. भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले की, गेल्या ५ वर्षात तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला हे तुम्हाला आणि आम्हाला माहीत आहे. या विजयामागे एकच कारण आहे आणि ते म्हणजे काँग्रेस कर्नाटकातील गरीब, मागास आणि दलितांच्या पाठीशी उभी राहिली. ते म्हणाले की, द्वेष मिटला आणि प्रेमाचा विजय झाला, असे आम्ही यात्रेदरम्यान सांगितले होते. कर्नाटकाने द्वेषाच्या बाजारात लाखो प्रेमाची दुकाने उघडली आहेत.
 

Web Title: rahul gandhi announced fulfill five promise in karnataka within 2 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.