लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी? प्रतिमा बदलण्यासाठी पक्षाचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 08:12 AM2024-06-11T08:12:45+5:302024-06-11T08:13:14+5:30
Rahul Gandhi News: लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पक्षाने उत्तम कामगिरी केली. जे मुद्दे घेऊन ते जनतेत गेले, त्यामुळे भाजपला बहुमत मिळाले नसल्याचे समाधान काँग्रेस नेत्यांना आहे. राहुल यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
- आदेश रावल
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पक्षाने उत्तम कामगिरी केली. जे मुद्दे घेऊन ते जनतेत गेले, त्यामुळे भाजपला बहुमत मिळाले नसल्याचे समाधान काँग्रेस नेत्यांना आहे. राहुल यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, राहुल लोकसभेत विरोधी पक्षनेते होणार आहेत. तसा प्रस्तावही काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर झाला. पक्ष रणनीतीकार गेल्या दोन वर्षांपासून राहुल यांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारत जोडो यात्रा, संविधान, जातनिहाय जनगणना या मुद्यांवरून राहुल जनतेच्या प्रश्नांच्या जवळ आल्याचे रणनीतीकारांना वाटते. विरोधी पक्षनेतेपदानंतर राहुल यांना पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्यावरही सहमती केली जात आहे.
काय आहे रणनीती?
nभारत जोडो यात्रेपूर्वी राहुल गांधी यांची प्रतिमा वेगळी होती. भाजपने आपली प्रतिमा खराब केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यापूर्वी केलेला आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी यात्रा काढून प्रतिमा बदलली.
nराहुल गांधींबद्दल असा समज निर्माण झाला, की ते जबाबदारीपासून दूर पळतात. ते पडद्याआडून पक्ष चालवू इच्छितात. त्यामुळेच राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. जेणेकरून ते जबाबदारीपासून दूर जातात, हा समज दूर करता येईल.