"नोकरी हिसकावली, जमवलेले पैसे हडपले, कोरोना रोखू शकले नाही मात्र 'ते' खोटी स्वप्न दाखवत राहिले"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 09:38 AM2020-07-29T09:38:49+5:302020-07-29T09:54:40+5:30

कोरोना व्हायरसवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

rahul gandhi attack on modi government over jobs and spending savings by tweet | "नोकरी हिसकावली, जमवलेले पैसे हडपले, कोरोना रोखू शकले नाही मात्र 'ते' खोटी स्वप्न दाखवत राहिले"

"नोकरी हिसकावली, जमवलेले पैसे हडपले, कोरोना रोखू शकले नाही मात्र 'ते' खोटी स्वप्न दाखवत राहिले"

googlenewsNext

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या ही जवळपास 15 लाखांपर्यंत पोहोचली आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोना व्हायरसवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे अनेकाच्या नोकऱ्या केल्या आहेत.  मोठ्या संख्येने लोक बेरोजगार झाले आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. "नोकरी हिसकावली, जमवलेले पैसेही हडपले, आजाराचा संसर्ग रोखू शकले नाही मात्र ते जनतेला खोटी स्वप्न दाखवत राहिले" असं ट्विट राहुल यांनी केलं आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून EPFO संदर्भातील एक वृत्त शेअर करत असं म्हटलं आहे. 

कोरोनाच्या संकटात आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या लोकांच्या पीएफमधील पैसेच सध्या आधार बनले आहेत. लोक त्याच पैशातून आपल्या गरजा पूर्ण करत आहेत. गेल्या चार महिन्यांत ईपीएफओमधून जवळपास 30 हजार कोटी रुपये काढण्यात आले आहेत अशी माहिती राहुल गांधींनी ट्विट केलेल्या वृत्तातून देण्यात आली आहे. याआधीही काही दिवसांपर्वी राहुल यांनी नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. भविष्यात हॉवर्डमध्ये जेव्हा अपयशावर अभ्यास केला जाईल तेव्हा कोविड, नोटबंदी आणि जीएसटी या तीन गोष्टींचा उल्लेख असेल असं म्हटलं होतं. 

राहुल गांधी भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न असल्याचं म्हटलं होतं. "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:ची प्रतिमा तयार करण्यावर 100 टक्के लक्ष केंद्रीत केले आहे. भारतातील सर्व संस्था तेच काम करण्यामध्ये व्यस्त आहेत. एका माणसाची प्रतिमा राष्ट्रीय दृष्टीकोनाला पर्याय असू शकत नाही" असं म्हणत राहुल यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : "राम मंदिर बांधल्यावर कोरोना देशातून पळून जाईल", भाजपा खासदाराचा दावा

CoronaVirus News : 'कोणीच लक्ष देत नाही, दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जा'; मृत्यूनंतर कोरोनाग्रस्ताचा Video व्हायरल

CoronaVirus News : "कोरोनावरील उपचाराबाबत दोन आठवड्यात देणार 'खूशखबर', करणार मोठी घोषणा"

कौतुकास्पद! भारताच्या लेकींची कमाल, शोधला मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा 'लघुग्रह' 

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! 'या' देशात कोरोनाचा उद्रेक, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना लागण

सप्तपदीनंतर नवरा-नवरी पोहोचले थेट पोलीस ठाण्यात; कारण ऐकून तुम्हीही कराल भरभरून कौतुक

CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशाचा रिकव्हरी रेट 64.23%, जगभरात एक कोटी लोकांनी केली कोरोनावर मात

CoronaVirus News : मोठं यश! कोरोनाला रोखणारी 21 औषधं सापडली; शास्त्रज्ञांचा दावा

Web Title: rahul gandhi attack on modi government over jobs and spending savings by tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.