Rafale Deal: दलाली, भ्रष्टाचारावर उच्चपदस्थ पडदा टाकण्याच्या प्रयत्नात; काँग्रेस, माकपचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 03:56 AM2021-04-08T03:56:22+5:302021-04-08T03:56:46+5:30
राफेल लढावू विमानांच्या खरेदीबाबत फ्रान्सकडून झालेल्या खुलाशानंतर आता काँग्रेससोबत डावे पक्ष सक्रिय झाले आहेत.
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : राफेल लढावू विमानांच्या खरेदीबाबत फ्रान्सकडून झालेल्या खुलाशानंतर आता काँग्रेससोबत डावे पक्ष सक्रिय झाले आहेत. त्यांनी आरोप केला की, ३६ राफेल लढावू विमानांच्या खरेदीत कथित रूपात दलाली दिल्याचा खुलासा झाला. परंतु, भारत आणि फ्रान्समध्ये उच्च पदांवर बसलेले लोक ही दलाली आणि भ्रष्टाचारावर पडदा टाकण्याच्या प्रयत्नात आहेत.
माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी राफेल खरेदीचा मुद्दा ट्वीटरवर उपस्थित करून म्हटले की, “पंतप्रधानजी, सत्य लपवले जाऊ शकत नाही. आता एका उच्चस्तरीय चौकशीचे आदेश द्यावेत.”
माकपने औपचारिक निवेदनात संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. पक्षाने पंतप्रधान मोदी यांना थेट विचारले की, जुना आदेश रद्द करून ३६ राफेल विमाने खरेदी करण्याची गरज का पडली? जुना आदेश युपीए सरकारच्या काळात फ़्रान्सशी झालेल्या शर्तींवर आधारित होता, त्यानुसार विमानांची खरेदी का झाली नाही? राहुल गांधी यांनी राफेलबाबत सतत मोदी यांच्यावर हल्ला करणारे ट्वीट केले, “ कर्म - किये कराये का बही खाता। इससे कोई नहीं बच सकता। राफेल.”
युक्तिवाद फेटाळून लावले
उच्चपदस्थ सूत्रांनुसार काँग्रेस इतर पक्षांना सोबत घेऊन फ़्रान्सकडून झालेल्या नव्या खुलाशानंतर राफेल विमानांच्या खरेदीच्या मुद्द्यावर पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्यता पडताळून बघत आहे. उल्लेखनीय हे आहे की, सर्वोच्च न्यायालयाने याआधी या विमान खरेदीबाबत प्रशांत भूषण व इतरांचे युक्तिवाद फेटाळून लावले होते.