"21 दिवसांत कोरोना संपवण्याचं वचन होतं पण कोट्यवधी रोजगार, छोटे उद्योग संपवण्यात आले"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 01:08 PM2020-09-09T13:08:47+5:302020-09-09T13:24:29+5:30

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करून जोरदार निशाणा साधला आहे. 

rahul gandhi attacks modi govt handling corona calling it modi disaster plan | "21 दिवसांत कोरोना संपवण्याचं वचन होतं पण कोट्यवधी रोजगार, छोटे उद्योग संपवण्यात आले"

"21 दिवसांत कोरोना संपवण्याचं वचन होतं पण कोट्यवधी रोजगार, छोटे उद्योग संपवण्यात आले"

Next

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनवरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. विविध मुद्द्यांवरून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत आहेत. देशामध्ये अचानक करण्यात आलेला लॉकडाऊन असंघटीत कामगारांसाठी मृत्यूदंडासारखाच सिद्ध झाल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करून जोरदार निशाणा साधला आहे. 

"अचानक लागू करण्यात आलेला लॉकडाऊन असंघटीत क्षेत्रासाठी मृत्यूदंडासारखाच सिद्ध झाला. 21 दिवसांत कोरोना संपवण्याचं वचन दिलं होतं पण कोट्यवधी रोजगार आणि छोटे उद्योग संपवण्यात आले. मोदीजींचा जनविरोधी 'डिझास्टर प्लॅन' जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पाहा" असं म्हणत राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ देखील ट्विट केला आहे. "कोरोनाच्या नावावर जे केलं, ते असंघटीत क्षेत्रावरील तिसरं आक्रमण होतं. छोट्या आणि मध्यम उद्योग चालवणारे लोक रोज कमवतात आणि खातात. जेव्हा कोणतीही सूचना न देता लॉकडाऊन केलं तेव्हा ते यांच्यावरील आक्रमण होतं."

'असंघटीत क्षेत्राचा 21 दिवसांत कणाच तुटला'

"पंतप्रधानांनी  21 दिवसांची लढाई असेल असं सांगितलं होतं पण असंघटीत क्षेत्राचा 21 दिवसांत कणाच तुटला. लॉकडाऊननंतर तो उठवण्याची वेळ आली. या काळात काँग्रेसने एक नाही, तर अनेक वेळा सांगितलं की, गरिबांची मदत करावीच लागेल. न्याय योजनेसारखी एक योजना लागू करावी लागेल. थेट बँक खात्यात पैसे जमा करावे लागतील. पण तसं नाही केलं. सुक्ष्म आणि लघू उद्योगांसाठी पॅकेज तयार करा. त्यांना वाचवण्याची गरज आहे. या पैशाशिवाय हे उद्योग नाही जगणार. सरकारे काहीच केलं नाही. उलट सरकारने सर्वात श्रीमंत लोकांचा लाखो करोडो रुपयांचा टॅक्स भरला."

'आक्रमण समजून घ्यावं लागेल, या आक्रमणाविरोधात उभ राहावं लागेल'

"लॉकडाऊन कोरोनावर आक्रमण नव्हतं. लॉकडाऊन देशातील गरिबांवरील आक्रमण होतं. युवकांच्या भविष्यावर आक्रमण होतं. लॉकडाउन मजूर, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांवर आक्रमण होतं. आपल्या असंघटीत अर्थव्यवस्थेवर आक्रमण होतं. आपल्याला हे आक्रमण समजून घ्यावं लागेल. या आक्रमणाविरोधात उभ राहावं लागेल" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

"मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न", राहुल गांधींचं पंतप्रधानांवर टीकास्त्र

राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून मोदींवर निशाणा साधत आहेत. "मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न" असं म्हणत राहुल यांनी पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडलं आहे. "मोदीजी, सरकारी कंपनी विका मोहीम चालवत आहेत. स्वतःच निर्माण केलेल्या आर्थिक अरिष्टाची भरपाई करण्यासाठी देशाची संपत्ती थोडी थोडी करून विकली जात आहे. जनतेचं भविष्य आणि विश्वास बाजूला ठेवून LIC ला विकणं मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न आहे" असं म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

दिलदार सुपरहिरो! सिम कार्डवर सोनू सूदचं चित्र, अभिनेत्याने दिली भन्नाट रिअ‍ॅक्शन 

"... तर मी जनतेसमोर 100 उठाबशा काढेन", ममता बॅनर्जींनी दिलं आव्हान

CoronaVirus News : मोठा निर्णय! 'या' राज्यात मोफत होणार कोरोना चाचणी

CoronaVirus News : हे कसले आई-बाप?, नवजात बाळाला कोरोनाची लागण; रुग्णालयात सोडून जन्मदात्यांनी काढला पळ

कडक सॅल्यूट! 'मजुरांच्या मुलांवर मजुरीची वेळ येऊ नये म्हणून...', शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार

Web Title: rahul gandhi attacks modi govt handling corona calling it modi disaster plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.