Rahul Gandhi Attacks Modi Govt: "भारतात हक्क मागणाऱ्यांना अटक केले जाते", राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 02:35 PM2022-07-17T14:35:13+5:302022-07-17T14:35:21+5:30

Rahul Gandhi Attacks Modi Govt: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला.

Rahul Gandhi Attacks Modi Govt: "Those who demand rights in India are arrested", Rahul Gandhi criticizes the Central Govt. | Rahul Gandhi Attacks Modi Govt: "भारतात हक्क मागणाऱ्यांना अटक केले जाते", राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

Rahul Gandhi Attacks Modi Govt: "भारतात हक्क मागणाऱ्यांना अटक केले जाते", राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

googlenewsNext

Rahul Gandhi Attacks Modi Govt:काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अनेकदा महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. आता राहुल गांधींनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन केंद्रातील मोदी सरकारवर (Central Goverenment) पुन्हा निशाणा साधला आहे. केंद्रावर गंभीर आरोप करत त्यांना हुकूमशहा म्हटले आहे. 

तरुणांना बेरोजगार करून सरकार कोट्यवधी कुटुंबांच्या आशा मोडीत काढत असल्याचा आरोपही राहुल यांनी केला. राहुल यांनी काही विद्यार्थ्यांचा व्हिडीओही पोस्ट केला आहे, ज्यात ते आपल्या हक्काची मागणी करत आहे. तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी गेल्या पाच वर्षांत 20 ते 24 वयोगटातील तरुणांमधील बेरोजगारीचा दर दुप्पट केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ताशेरे ओढले.

राहुल सरकारला हुकूमशहा म्हणाले
राहुल गांधींनी ट्विट केले की, "प्रश्न विचारू नका, आवाज उठवू नका, शांततेने आंदोलन करू नका, नवीन भारतात हक्क मागणाऱ्यांना अटक केले जाते. तरुणांना बेरोजगार करून, कोट्यवधी कुटुंबांच्या आशा मोडीत काढत हे हुकूमशाही सरकार देशाचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे.'

यापूर्वीही प्रश्न उपस्थित केले 
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर गेल्या 5 वर्षात 20 ते 24 वयोगटातील तरुणांमधील बेरोजगारी दुप्पट केल्याबद्दल हल्ला चढवला होता. पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवत राहुल गांधी यांनी विचारले होते की, टटदेशातील तरुण पंतप्रधानांच्या ‘लबाडी’साठी ‘भूल करणारा’, ‘विश्वासघात’ आणि ‘फसवणूक’ यासारखे ‘असंसदीय’ शब्द वापरू शकतात का?'' असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला.

Web Title: Rahul Gandhi Attacks Modi Govt: "Those who demand rights in India are arrested", Rahul Gandhi criticizes the Central Govt.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.