केंद्रातील मोदी सरकारवर राहुल गांधींचे हल्ले; जगातील आनंदी देशांची दिली यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 06:02 AM2022-03-21T06:02:31+5:302022-03-21T06:03:23+5:30

देश घृणा आणि आक्रोश याबद्दल जगातील देशांच्या यादीत कळसावर पोहोचेल तो दिवस फार काही दूर नाही, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

rahul gandhi attacks on the central modi government and show list of happiest countries in the world | केंद्रातील मोदी सरकारवर राहुल गांधींचे हल्ले; जगातील आनंदी देशांची दिली यादी

केंद्रातील मोदी सरकारवर राहुल गांधींचे हल्ले; जगातील आनंदी देशांची दिली यादी

Next

शीलेश शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : काँग्रेसमध्येराहुल गांधी यांच्या नेतृत्वावरून सुरू असलेल्या वादानंतरही मोदी सरकारवर  राहुल गांधी तीव्र शब्दांत हल्ले करीत आहेत. राहुल गांधी यांनी आकडेवारी देत मोदी सरकारच्या धोरणांना लक्ष्य केले. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, देश घृणा आणि आक्रोश याबद्दल जगातील देशांच्या यादीत कळसावर पोहोचेल तो दिवस फार काही दूर नाही. 

विश्व प्रसन्नता अहवालाचा आधार घेत राहुल गांधी यांनी म्हटले की, सरकारची चुकीची विचारधारा आणि दृष्टिकोनामुळे आम्ही १३६ व्या स्थानावर पोहोचलो आहोत. स्वातंत्र्याच्या यादीत ११९ व्या, तर आनंदाच्या देशवासीयांच्या आकलनात आम्ही जगातील देशांच्या तुलनेत १३६ व्या क्रमांकावर आहोत. 
ही परिस्थिती आज आहे. जर हाच हा प्रवास असाच राहिला तर आम्ही जगाचा असा दृष्टिकोन आणि सामजिक व्यवस्थेत कळसावर असू व ती परिस्थिती देशाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत घातक सिद्ध होईल.

जगातील आनंदी देशांची दिली यादी

राहुल गांधी यांनी जगातील आनंदी देशांची यादीही दिली. त्यात फिनलँड, डेन्मार्क, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंकेसारखे देश भारतापेक्षा आनंदी आहेत. भारत खालच्या पायऱ्यांवर का आहे, हे सांगण्यासाठी गांधी यांनी ढासळती अर्थव्यवस्था, गरिबी, महागाईचाही उल्लेख केला.

Web Title: rahul gandhi attacks on the central modi government and show list of happiest countries in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.