Bharat Jodo Yatra, Congress Internal Disputes: राहुल गांधी 'भारत जोडो'मध्ये मग्न, दुसरीकडे काँग्रेसमध्ये फुटीची चिन्हं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 04:36 PM2022-12-04T16:36:22+5:302022-12-04T16:37:10+5:30

सध्या भारत जोडो यात्रा राजस्थानात सुरू आहे

Rahul Gandhi busy in Bharat Jodo Yatra but Rajasthan congress suffers with internal political disputes Sachin Pilot vs Ashok Gehlot | Bharat Jodo Yatra, Congress Internal Disputes: राहुल गांधी 'भारत जोडो'मध्ये मग्न, दुसरीकडे काँग्रेसमध्ये फुटीची चिन्हं?

Bharat Jodo Yatra, Congress Internal Disputes: राहुल गांधी 'भारत जोडो'मध्ये मग्न, दुसरीकडे काँग्रेसमध्ये फुटीची चिन्हं?

Next

Bharat Jodo Yatra, Congress Internal Disputes: सध्या काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) देशभर भारत जोडो यात्रा करत आहेत. सध्यांच्या यात्रेतील राजस्थानचा टप्पा सुरू आहे. आतापर्यंत त्यांच्या यात्रेला अनेक सेलिब्रिटींनीही पाठिंबा दर्शवला आहे. मात्र या साऱ्या बाबींदरम्यान राजस्थानकाँग्रेसमधील बहुचर्चित फुटीचा परिणाम काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर दिसून येईल, अशी चर्चा सुरू आहे. आज सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या समर्थकांनी त्यांचे पोस्टर हटवल्यानंतर झालावाडमध्ये निदर्शने केली. दरम्यान, काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पक्षातील गटबाजीचे वृत्त फेटाळून लावले आहे. सचिन पायलट म्हणाले की, राजस्थान काँग्रेस (Rajasthan Congress) पूर्णपणे एकजूट आहे. सध्या राजस्थानमध्ये इतर राज्यांपेक्षा भारत जोडो यात्रा यशस्वी करण्यावर आमचा भर आहे.

मुख्यमंत्रिपदाबद्दल पायलट काय म्हणाले?

माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी असलेल्या विसंवादावरील प्रश्नांना उत्तर देताना, या अफवा पसरवल्याचा आरोप भाजपवर केला. सचिन पायलट म्हणाले की, हे सर्व त्या पक्षाच्या वतीने घडत आहे जेथे मुख्यमंत्रीपदाचे डझनभर दावेदार आहेत. सचिन पायलट म्हणाले की, भाजपमध्ये खूप गटबाजी आहे. राजस्थानमध्ये गेल्या ४ वर्षात त्यांना चांगल्या विरोधी पक्षाची भूमिका बजावता आली नाही. त्यामुळे नैराश्यामुळे ते अशा अफवा पसरवत आहेत.

राजस्थान काँग्रेसमध्ये खरंच फुटीची चिन्हं?

राजस्थानमध्ये होणाऱ्या 'भारत जोडो यात्रे'बाबत सचिन पायलट यांना विचारले असता, राहुल गांधींच्या दौऱ्याबाबत संपूर्ण पक्षात एकता असल्याचे सचिन पायलट यांनी सांगितले. "यात्रा यशस्वी करण्यासाठी आम्ही एकत्र काम करत आहोत. कोणत्याही A, B किंवा C व्यक्तीचा प्रश्नच येत नाही. एक पक्ष म्हणून आम्ही राजस्थानमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी खूप मेहनत घेतली. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दिशेने आमच्या प्रयत्नांना बळ मिळेल. काही कथा रचण्याचा प्रयत्न होऊ शकतो. वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण पक्ष एकसंध आहे. इतर राज्यांपेक्षा राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रा अधिक यशस्वी व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे," असे सूचक विधान त्यांनी केले.

Web Title: Rahul Gandhi busy in Bharat Jodo Yatra but Rajasthan congress suffers with internal political disputes Sachin Pilot vs Ashok Gehlot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.