राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान राहुल गांधी होते मोबाइलवर बिझी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 04:30 PM2019-06-20T16:30:44+5:302019-06-20T16:36:59+5:30

किरकोळ चुका आणि कृतींमुळे सातत्याने विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य होणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एखदा अडचणीत सापडले आहेत.

Rahul Gandhi Busy on mobile when President's address Parliament | राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान राहुल गांधी होते मोबाइलवर बिझी

राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान राहुल गांधी होते मोबाइलवर बिझी

Next

नवी दिल्ली -  किरकोळ चुका आणि कृतींमुळे सातत्याने विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य होणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एखदा अडचणीत सापडले आहेत. आज संसदेच्या संयुक्त सभेसमोर राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू असताना केलेल्या कृतीमुळे ते विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.आज राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी  हे भाषणाकडे लक्ष देण्याऐवजी मोबाइलवर व्यस्त असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. 

17 व्या लोकसभेतील नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आटोपल्यानंतर आज संसदेच्या संयुक्त सभेसमोर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण झाले. राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मात्र आपल्याच विश्वात मग्न असल्याचे कॅमेऱ्याने टिपले. एकीकडे राष्ट्रपती आपल्या भाषणामधून विविध मुद्दे मांडत होते. तर राहुल गांधी मात्र मोबाइलवर काहीतरी टाइप करत असल्याचे एका व्हिडीओमधून दिसत आहे. सुमारे एक तास चाललेल्या राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यान सुमारे 24 मिनिटे राहुल गांधी मोबाइलवर गुंतलेले दिसत होते. 


यावेळी त्यांच्याशेजारी बसलेल्या यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधी मात्र राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील मुद्दे लक्षपूर्वक ऐकत होत्या. तसेच त्यातील काही मुद्द्यांना दादही देत होत्या. मात्र राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींनी अभिभाषणादरम्यान मांडलेल्या कुठल्याही मुद्द्याला दाद दिली नाही. दरम्यान, राष्ट्रपती सरकारने मिळवलेल्या यशाचा उल्लेख करत असताना राहुल गांधी हे संसदेमध्ये फोटो काढताना आणि सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करताना दिसत होते. 




उरी येथील सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोट येथील एअर स्ट्राइकचा उल्लेख राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणामध्ये केल्यानंतर संपूर्ण सभागृहाने त्याला जोरदार दाद दिली. सोनिया गांधी यांनीही बाक वाजवून दाद दिली. मात्र राहुल गांधी यांनी त्यावर काहीही प्रतिसाद दिला नाही. 

Web Title: Rahul Gandhi Busy on mobile when President's address Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.