...अन् अखेर राहुल गांधी ट्विटरवर नवं नाव घेऊन अवतरले!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 10:22 AM2018-03-17T10:22:12+5:302018-03-17T10:22:12+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा भाजपावरील, केंद्रातील मोदी सरकारवरील हल्ला आता अधिक 'थेट' होणार आहे.
नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा भाजपावरील, केंद्रातील मोदी सरकारवरील हल्ला आता अधिक 'थेट' होणार आहे. कारण, राहुल गांधी यांनी आपल्या @officeofRG या ट्विटर हँडलचं नामकरण @RahulGandhi असं केलं आहे.
गेली अनेक वर्षं राहुल गांधी ट्विटरवर सक्रिय आहेत. काही महिन्यांपासून तर, मोदी सरकारला लक्ष्य करण्यासाठी ते सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर करताहेत. परंतु, @officeofRG हे त्यांचं ट्विटर हँडल 'यूजर फ्रेंडली' नसल्याचं अनेक जाणकारांचं मत होतं. त्याऐवजी अन्य राजकीय नेत्यांप्रमाणे थेट नावाचं ट्विटर हँडल त्यांनी घ्यावं, अशी सूचना अनेकांनी केली होती. अखेर, ती राहुल यांनी स्वीकारलीय. ट्विटर हँडलच्या नावासोबतच त्यांनी आपला फोटोही बदलला आहे. याबाबतची माहिती काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आणि सोशल मीडिया प्रमुख दिव्या राम्या यांच्या ट्विटरवरूनही देण्यात आली आहे.
Welcome delegates and distinguished guests to the #CongressPlenary.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 17, 2018
Over the next two days I look forward to interacting with you and to sharing experiences and perspectives that will together help us build a stronger, more vibrant Congress party.
Jai Hind.
Please note Congress President Rahul Gandhi's new Twitter handle @RahulGandhi#ChangeIsNowpic.twitter.com/PbN8H9gYci
— Congress (@INCIndia) March 17, 2018
काँग्रेसच्या तीन दिवसीय महाअधिवेशनात अध्यक्ष म्हणून आज राहुल गांधी पहिल्यांदाच भाषण करणार आहेत. त्यांच्या भाषणाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे.