VIDEO: राहुल गांधी बनले शेफ; उटीतील कारखान्यात बनवले चॉकलेट, शेअर केली अनोखी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 08:10 PM2023-08-27T20:10:31+5:302023-08-27T20:11:17+5:30

Rahul Gandhi Chocolate Factory Visit: गेल्या काही काळापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. .

Rahul Gandhi Chocolate Factory Visit: Rahul Gandhi becomes a chef; A chocolate made in a factory in ooty, shared a unique story | VIDEO: राहुल गांधी बनले शेफ; उटीतील कारखान्यात बनवले चॉकलेट, शेअर केली अनोखी गोष्ट

VIDEO: राहुल गांधी बनले शेफ; उटीतील कारखान्यात बनवले चॉकलेट, शेअर केली अनोखी गोष्ट

googlenewsNext

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) रविवारी एका वेगळ्याच भूमिकेत दिसले. त्यांनी तमिळनाडूतील उटीमध्ये एका चॉकलेट कारखान्याला भेट दिली. यावेळी राहुल यांनी स्वतःच्या हाताने चॉकलेट बनवले. याचा व्हिडिओ राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते चॉकलेट बनवताना आणि जीएसटीवर चर्चा करताना दिसत आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X(ट्विटर) वर व्हिडिओची एक क्लिप शेअर करताना राहुल यांनी लिहिले, '70 अविश्वसनीय महिलांची टीम उटीमधील प्रसिद्ध चॉकलेट फॅक्टरी चालवते. मॉडीज चॉकलेट्सची कथा ही भारतातील एमएसएमईच्या प्रचंड क्षमतेची उल्लेखनीय साक्ष आहे. माझ्या निलगिरी भेटीदरम्यान जे काही समोर आले ते येथे पाहता येईल.

राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड येथील त्यांच्या लोकसभा मतदारसंघात जाताना निलगिरीमध्ये वसलेल्या प्रसिद्ध ऊडी हिल टाऊनला भेट दिली. या सात मिनिटांच्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी बेकर बनून कारखान्यात चॉकलेट बनवण्याची प्रक्रिया शिकताना दिसत आहेत. यादरम्यान त्यांनी काही तमिळ शब्दही शिकण्याचा प्रयत्न केला. राहुल यांचा संपूर्ण व्हिडिओ युट्यूबवरही खूप पाहिला जात आहे.
 

Web Title: Rahul Gandhi Chocolate Factory Visit: Rahul Gandhi becomes a chef; A chocolate made in a factory in ooty, shared a unique story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.