...अन् वेळ वाया घालवल्याचा आरोप करत राहुल गांधी 'त्या' बैठकीतून निघाले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 03:01 AM2020-12-17T03:01:16+5:302020-12-17T06:55:23+5:30

काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजीव सातव, रेवनाथ रेड्डींचा सभात्याग

Rahul Gandhi, Congress members walk out of Defence Parliamentary panel meeting | ...अन् वेळ वाया घालवल्याचा आरोप करत राहुल गांधी 'त्या' बैठकीतून निघाले

...अन् वेळ वाया घालवल्याचा आरोप करत राहुल गांधी 'त्या' बैठकीतून निघाले

Next

नवी दिल्ली : लष्करातील जवानांना आधुनिक शस्त्रास्त्रांनी आणखी सुसज्ज कसे करता येईल यापेक्षा त्यांच्या गणवेशावरच संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीने अधिक काळ चर्चा करून वेळ वाया घालवला असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजीव सातव, रेवनाथ रेड्डी या तिघांनी केला. तसेच या समितीच्या बैठकीतून बुधवारी सभात्याग केला.

या बैठकीला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत उपस्थित होते. लष्करी जवानांचा गणवेश कसा असावा याबाबत त्या दलाचे वरिष्ठ अधिकारी निर्णय घेऊ शकतात. तरीही त्याच विषयावर संरक्षणविषयक संसदीय समितीचे सदस्य अधिक चर्चा करत बसले व वेळ वाया दडविला असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

परवानगी नाकारली
लडाखजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात केलेल्या जवानांबद्दलचा मुद्दा राहुल गांधी यांना या समितीच्या बैठकीत उपस्थित करायचा होता. मात्र त्याला संरक्षणविषयक संसदीय समितीचे अध्यक्ष व भाजप खासदार जुआल ओराम यांनी परवानगी दिली नाही. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषयांवर संरक्षणविषयक संसदीय समितीत चर्चा झाली पाहिजे असे राहुल गांधी म्हणाले.

Web Title: Rahul Gandhi, Congress members walk out of Defence Parliamentary panel meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.