राहुल गांधींनी बनविली काँग्रेसची जम्बो कार्य समिती, महाराष्ट्रातून पाच जणांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 10:26 PM2018-07-17T22:26:55+5:302018-07-17T22:27:15+5:30

सुशीलकुमार शिंदे, दिग्विजय यांना वगळले

Rahul Gandhi created the Jambo task committee of Congress, including five people from Maharashtra | राहुल गांधींनी बनविली काँग्रेसची जम्बो कार्य समिती, महाराष्ट्रातून पाच जणांचा समावेश

राहुल गांधींनी बनविली काँग्रेसची जम्बो कार्य समिती, महाराष्ट्रातून पाच जणांचा समावेश

Next

नवी दिल्ली : दीर्घ प्रतीक्षेनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या सर्वोच्च ‘काँग्रेस कार्यसमिती’ची घोषणा केली असून यात २३ ज्येष्ठ नेत्यांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. याशिवाय १८ स्थायी सदस्य, १० विशेष निमंत्रितांचा समावेश आहे. काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच जम्बो कार्य समिती स्थापन करण्यात आली आहे. यात १० युवा नेत्यांना प्रथमच कार्यसमितीत स्थान देण्यात आले आहे. २३ सदस्यांच्या या कार्यसमिती सदस्यात पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी, मनमोहन सिंग, मोतीलाल व्होरा, गुलामनबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, ए. के. अँटोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, ओमान चांडी, तरुण गोगोई, सिद्धरामय्या, आनंद शर्मा, हरीश रावत, सैलजा, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, के. सी. वेणुगोपाल, दीपक बाबरिया, टी.साहू, रघुवीर मीना, गईखंगम, अशोक गेहलोत यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून पाच जणांना यात स्थान देण्यात आले असून प्रामुख्याने मुकुल वासनिक, अविनाश पांडेय, बाळासाहेब थोरात, रजनी पाटील आणि राजीव सातव यांचा समावेश करण्यात आला आहे.       

स्थायी निमंत्रित सदस्यात शीला दीक्षित, पी. चिदंबरम, ज्योतिरादित्य शिंदे, बाळासाहेब थोरात, तारिक हमीद कर्रा, पी. सी. चाको, जितेंद्र सिंह, आर. पी.एन. सिंह, पी.एल. पुनिया, रणदीप सुरजेवाला, आशा कुमारी, रजनी पाटील, रामचंद खुंटिया, अनुराग नारायण सिंह, राजीव सातव, शक्तिसिंह गोहिल, गौरव गोगोई, ए. चेल्ला कुमार यांच्या नावांचा समावेश आहे. विशेष निमंत्रित सदस्यात के. एच. मुन्नीयप्पा, अरुण यादव, दीपेंद्र हु्ड्डा, जितिन प्रसाद, कुलदीप विश्नोई यांच्याशिवाय सेवा दल प्रमुखांचा यात समावेश आहे. 

सुशीलकुमार शिंदे, जर्नादन व्दिवेदी, कमलनाथ, मोहन प्रकाश, सी.पी. जोशी हे सोनिया गांधी अध्यक्ष असताना पक्षात दबदबा ठेऊन होते. मात्र, आता त्यांना बाहेर ठेवण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना कार्यसमितीत सहभागी करुन घेण्यासोबतच महासचिव पद देऊन आसाम राज्याचे प्रभारी करण्यात आले आहे.

Web Title: Rahul Gandhi created the Jambo task committee of Congress, including five people from Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.