बाईक सर्व्हिसिंग ते कामगारांची विचारणा; मोटार मॅकेनिकसोबत राहुल गांधींनी साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 03:01 PM2023-07-09T15:01:46+5:302023-07-09T15:03:06+5:30

राहुल गांधी दिल्लीतील करोलबाग भागात गेले, त्यांनी स्वतः गाडीची सर्व्हिसिंग केली. यावेळी त्यांनी मेकॅनिक लोकांच्या समस्याही जाणून घेतल्या.

rahul gandhi delhi-karolbagh-streets-mechanic-shop-bike-service | बाईक सर्व्हिसिंग ते कामगारांची विचारणा; मोटार मॅकेनिकसोबत राहुल गांधींनी साधला संवाद

बाईक सर्व्हिसिंग ते कामगारांची विचारणा; मोटार मॅकेनिकसोबत राहुल गांधींनी साधला संवाद

googlenewsNext

Rahul Gandhi :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा संपल्यानंतरही सामान्य लोकांच्या भेटी सुरुच ठेवल्या आहेत. ते सातत्याने विविध क्षेत्रातील सामान्य लोकांच्या भेटी घेत आहेत. यातच आता राहुल गांधीदिल्लीतील करोलबाग येथील मेकॅनिक मार्केटमध्ये गेले. तिथे त्यांनी गाड्या दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिकशी संवाद साधला आणि स्वत: बाईक सर्व्हिसिंगही केली. यासोबतच त्यांनी दुकानांवर काम करणाऱ्या लोकांच्या समस्यांबाबत विचारणा केली. 

राहुल गांधी करोलबागमध्ये बाईक सर्व्हिसिंग करत असताना एका मेकॅनिकने त्यांना लग्नाबाबत विचारणा केली. त्यावर राहुल हसले आणि म्हणाले लवकरच होईल. राहुलने त्या मेकॅनिकलाही तुझे लग्न झाले आहे का, विचारले. बाईक सर्व्हिसिंगनंतर राहुल म्हणाले की, मेकॅनिक लोक काम कसे करतात, त्यांचे आयुष्य किती अवघड असते, हे मला समजून घ्यायचे होते.

ते पुढे म्हणाले की, या लोकांशिवाय कामे होऊ शकत नाही. शेतकऱ्याशिवाय अन्न मिळत नाही. पण लोकांना शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता वाटत नाही. यावर मेकॅनिक म्हणाला की, शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळत नाही. आम्हीही खूप मेहनत करतो, पण कंपनीचे लोक कधीच येऊन विचारत नाहीत की तुम्ही कसे जगता, कसे कमावता.

राहुलकडे कोणती बाईक आहे?
एका मेकॅनिकने राहुल यांना विचारले की, तुमच्याकडे कोणती बाईक आहे, त्यावर राहुल म्हणाले, माझ्याकडे केटीएम 390 आहे. पण, राहुल गांधींनी यावेळी त्यांचे एक दुःखही सांगितले. त्यांना इच्छा असूनही बाईक चालवता येत नाही. त्यांच्या सुरक्षेखातर सेक्युरिटीवाले त्यांना बाईक चालवू देत नाहीत. 

राहुल यांना बाईकबाबत खूप माहिती आहे
राहुल गांधी निघून गेल्यावर मेकॅनिक म्हणाले की, राहुल गांधी स्वतः आमच्याकडे आले आणि आमचे जीवन समजून घेतले. महागाई इतकी वाढली आहे की, महिनाभर कमवले तरी घराचे रेशन पूर्ण होत नाही. मुलांचे भविष्य, कपडे, सण, कर्ज, आजारपण, यातून आम्ही बाहेर येऊ शकत नाही. या सर्व गोष्टींची माहिती राहुल यांनी घेतली.  एक मेकॅनिक म्हणाला की, मी इतके नेते पाहिले आहेत, पण कोणीही आमच्या इतके जवळ आले नाही. आम्हाला कोणी भेटायला येत नाही.

भारत जोडो प्रवास सुरूच 
भारत जोडो यात्रेपासून राहुल गांधी सामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधत आहेत आणि त्यांच्या समस्या ऐकत आहेत. यापूर्वी 23 मे रोजी राहुल गांधी दिल्ली ते चंदीगड प्रवासादरम्यान ट्रकमधून प्रवास करताना दिसले होते. राहुल गांधी यांनी ट्रक चालकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व समस्या जाणून घेतल्या. कर्नाटक निवडणुकीच्या वेळी ते बंगळुरूमध्ये डिलिव्हरी बॉयसोबत स्कूटर चालवताना दिसले होते. राहुल गांधी त्यांच्या अमेरिका दौऱ्यातही ट्रक चालवताना दिसले. 

Web Title: rahul gandhi delhi-karolbagh-streets-mechanic-shop-bike-service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.