Rahul Gandhi : राहुल गांधींनी कार चालवली, भाजपने पोलिसांना चलन पाठवण्याची केली मागणी; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 12:32 PM2023-03-28T12:32:10+5:302023-03-28T12:34:24+5:30
शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली.
शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. यावरुन देशभरात काँग्रेसने निदर्शने केली, भाजप-काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता राहुल गांधी यांनी कार चालवल्यावरुनही भाजपने आरोप केले आहेत. या प्रकरणी भाजप नेत्याने राहुल गांधी यांचा फोटो शेअर केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आता खासदार आणि बंगल्यातील वाहतूक वादात अडकू शकतात. भारतीय जनता पक्षाने त्यांचा कार चालवतानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्या वाहनाच्या प्रमाणपत्रांची मुदत संपल्याचा दावा केला जात आहे. यासोबतच याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे चलन पाठवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
अजून तरी ती पातळी भाजपाने गाठलेली नाही; राहुल गांधींवरून पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली शंका
भाजप नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी राहुल यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.'माजी खासदार राहुल गांधी DL9CQ5112 कार चालवत आहेत. या कारचे प्रदूषण प्रमाणपत्र २७ जानेवारी २०२३ रोजी संपले आहे, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी वाहनाच्या सर्व तपशीलासह फोटो शेअर केला आहे.
बग्गा यांनी शेअर केलेल्या फोटोत काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधीही दिसत आहेत. हा फोटो सोमवारचा असल्याचे सांगण्यात आले आहे.
लोकसभा सदस्यत्व गमावल्यानंतर राहुल गांधी यांना बंगला रिकामा करावा लागणार आहे. सोमवारी सचिवालयाने १२, तुघलक लेन येथील बंगल्याबाबत नोटीसही जारी केली आहे. त्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.