झुकेगा नही म्हणणारा काँग्रेस नेता पोलिसांचा हात झटकून पळाला; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 04:53 PM2022-06-13T16:53:06+5:302022-06-13T16:53:25+5:30

राहुल गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यालयापासून ईडी ऑफिसपर्यंत प्रदर्शन केले.

Rahul Gandhi ED Enquiry case: Congress leaders Srinivas BV runs away to avoid detention when police stop him; VIDEO viral | झुकेगा नही म्हणणारा काँग्रेस नेता पोलिसांचा हात झटकून पळाला; Video व्हायरल

झुकेगा नही म्हणणारा काँग्रेस नेता पोलिसांचा हात झटकून पळाला; Video व्हायरल

googlenewsNext

बंगळुरू - नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी(Rahul Gandhi) आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. परंतु ईडी कारवाईविरोधात निषेध करण्यासाठी देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रमुख शहरातील ईडी कार्यालयावर निषेध आंदोलन केले. बेकायदेशीरपणे नॅशनल हेराल्डची मूळ कंपनी एजीएलची संपत्ती हडप केल्याचा आरोप गांधी कुटुंबावर लावण्यात आला आहे. याच प्रकरणात ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी तब्येतीचं कारण पुढे करत चौकशीसाठी काही वेळ वाढवून घेतला. तर राहुल गांधी आज ईडी कार्यालयात हजर झाले. 

राहुल गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यालयापासून ईडी ऑफिसपर्यंत प्रदर्शन केले. त्यात काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेतेही सहभागी झाले. यावेळी घडलेल्या एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. भारतीय जनता युवा मोर्चाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर अनेक नेटिझन्सच्या प्रतिक्रियाही येत आहेत. 

व्हिडीओत काय आहे? 
राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले युवक काँग्रेसचे अध्यक्ष बीवी श्रीनिवास निषेध आंदोलन करताना एका माध्यमांशी संवाद साधत होते. ते म्हणाले की, आम्ही राहुल गांधींचे कार्यकर्ते आहोत. अटक अथवा पोलिसांच्या लाठीला घाबरणारे नाही. त्यानंतर काही वेळात सोशल मीडियात श्रीनिवास यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात ते पोलिसांच्या हातातून निसटून पोबारा करताना दिसून आले. भारतीय जनता युवा मोर्चाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

काय आहे प्रकरण?
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र १९३८ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केले होते. हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) ने प्रकाशित केले होते. त्याची स्थापना १९३८ मध्ये झाली आणि इतर ५००० स्वातंत्र्य सैनिक त्याचे भागधारक होते. कंपनीने उर्दूमध्ये कौमी आवाज आणि हिंदीमध्ये नवजीवन ही इतर दोन दैनिकेही प्रकाशित केली. नॅशनल हेराल्डची ओळख भारताच्या स्वातंत्र्यामुळे झाली. वृत्तपत्राला देशातील महान राष्ट्रवादी वृत्तपत्र म्हणून प्रतिष्ठा मिळाली. जवाहरलाल नेहरू नियमितपणे वर्तमानपत्रात कठोर शब्दांत स्तंभ लिखान करायचे. याच एजीएल कंपनीची संपत्ती हडप केल्याचा आरोप गांधी कुटुंबावर आहे. त्याचा तपास सध्या ईडीकडून सुरू आहे.  
 

Web Title: Rahul Gandhi ED Enquiry case: Congress leaders Srinivas BV runs away to avoid detention when police stop him; VIDEO viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.