Rahul Gandhi ED: राहुल गांधी यांची आज चौथ्यांदा ED चौकशी; काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपतीचीं भेट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 10:29 AM2022-06-20T10:29:04+5:302022-06-20T10:29:11+5:30

Rahul Gandhi ED: नॅशनल हेराल्डच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राहुल गांधी यांची गेल्या आठवड्यात सगल तीन दिवस त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता आजही राहुल गांधी ईडीसमोर हजर राहणार आहेत.

Rahul Gandhi ED: Rahul Gandhi's ED inquiry today; Congress delegation to meet President | Rahul Gandhi ED: राहुल गांधी यांची आज चौथ्यांदा ED चौकशी; काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपतीचीं भेट घेणार

Rahul Gandhi ED: राहुल गांधी यांची आज चौथ्यांदा ED चौकशी; काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपतीचीं भेट घेणार

Next

Rahul Gandhi ED: नॅशनल हेराल्डच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांची आज पुन्हा चौथ्यांदा सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी केली जाणार आहे. गेल्याच आठवड्यात सगल तीन दिवस त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता आजही राहुल गांधी ईडीसमोर हजर राहणार आहेत. 

काँग्रेसची आजही निदर्शने
गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस राहुल गांधी यांची चौकशी झाली होती. राहुल गांधी यांनी पहिल्यांदा 13 जून रोजी ईडी कार्यालयात हजेरी लावली. राहुल गांधींच्या चौकशीवरुन देशभरातील काँग्रेस आक्रमक झाली, अनेक राज्यात केंद्र सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. आता आजही राहुल गांधींच्या चौकशविरोधात काँग्रेस दिल्लीत निदर्शने करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. 

सलग तीन दिवस चौकशी 
राहुल गांधी यांची गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस चौकशी झाली. यादरम्यान, राहुल यांना बँक खाती, परदेशी मालमत्ता आणि यंग इंडियन आणि असोसिएट जर्नल लिमिटेडला दिलेल्या कर्जाबाबत चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल गांधी यांनी संपूर्ण स्पष्टीकरण दिल्याची माहिती आहे. 

Web Title: Rahul Gandhi ED: Rahul Gandhi's ED inquiry today; Congress delegation to meet President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.