राहुल गांधी खोटे हिंदू, केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 13:52 IST2018-02-15T13:51:04+5:302018-02-15T13:52:49+5:30

Rahul Gandhi false Hindu, Union Minister Anant Hegde's criticism | राहुल गांधी खोटे हिंदू, केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांची बोचरी टीका

राहुल गांधी खोटे हिंदू, केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांची बोचरी टीका

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. आजकाल खोटे हिंदुत्ववादी जन्म घेत असल्याचा टोला त्यांनी लगावला. राहुल यांच्या कर्नाटक दौऱ्यामुळे लोकांचं चांगलंच मनोरंजन होत असल्याचं म्हणत अनंतर हेगडे यांनी राहुल गांधीवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी बुधवारी कर्नाटक दौऱ्याचा आपला पहिला टप्पा पूर्ण केला. उत्तर कन्नड जिल्ह्यातील सिरसी येथे माध्यमांशी बोलताना अनंत हेगडे यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

अनंत हेगडे यांनी म्हंटलं की, राहुल गांधी जितके वेळा कर्नाटकमध्ये येतील, तितकं चांगलं आहे. याच कारण म्हणजे कर्नाटकातील लोकांचं चांगलं मनोरंजन होईल. याशिवाय कर्नाटक भाजपाला यामुळे मजबूत होण्याची संधी मिळेल. कर्नाटकातील लोकांना आणखी मनोरंजन कार्यक्रमाची अपेक्षा आहे. आज खोटा हिंदूवादी नेता जन्म घेत आहे. मला आनंद आहे की, राष्ट्रवादाला विसरत आहेत. बनावट राष्ट्रवाद यालाच म्हणतात का, असा सवाल करत सिद्धरामय्या आणि राहुल यांनी किमान हे लक्षात ठेवलं आहे की ते हिंदू आहेत.

हिंदूत्व किंवा राष्ट्रवादावर फक्त चर्चा करणं पुरेसं नाही. त्याची अंमलबजावणी करा, तेव्हाच तुमचा सन्मान होईल, असं अनंत हेगडे यांनी म्हंटलं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गुजरात निवडणुकीत आणि कर्नाटकमध्ये झालेल्या सभांवेळी मंदिरांना भेटी दिल्या. या दौऱ्यांवरून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. 

Web Title: Rahul Gandhi false Hindu, Union Minister Anant Hegde's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.