राहुल गांधी हे 'डार्लिंग', 'बब्बर शेर', काँग्रेस नेत्यांकडून कौतुकाचा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 02:35 PM2017-12-04T14:35:36+5:302017-12-04T16:00:30+5:30
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला.
नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून राहुल गांधी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राहुल गांधींना 'डार्लिंग' असं म्हंटलं आहे. राहुल गांधी हे काँग्रेसची महान परंपरा पुढे नेतील, असा विश्वासही मनमोहन सिंह यांनी व्यक्त केला. तर नवज्योत सिंग सिद्धू यांनी राहुल यांना 'बब्बर शेर' म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.
Rahul Gandhi is a darling of the Congress and he will carry forward the great traditions of the party: Dr.Manmohan Singh pic.twitter.com/u7uKWZqWmd
— ANI (@ANI) December 4, 2017
भाजपातून नुकतेच काँग्रेसमध्ये आलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनीही राहुल गांधी यांना त्यांच्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या. राहुल हे बब्बर शेर आहेत, असं सिद्धू त्यांनी म्हटलं आहे. 'राहुल यांच्यात पंतप्रधानपदाचे सगळे गुण आहेत. ते चांगले पंतप्रधान होतील,' असं पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. पक्षाध्यक्षपदासाठी राहुल हेच योग्य आहेत,' असे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
100 bhedon ke aage ek sher lagao toh bheden sher ho jaati hain,100 sheron ke aage ek bhed laga do toh sher dher ho jaate hain. Yahan sher nahi babbar sher hai: Navjot Sidhu on #RahulGandhipic.twitter.com/AShaDVNGvv
— ANI (@ANI) December 4, 2017
राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड निश्चितही मानली जात आहे. पण, त्यांच्या निवडीवरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. घराणेशाहीच्या राजकारणावरून भाजपाने काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. दुसरीकडे काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या बाजूने उभे राहिले आहेत.