खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, दोन ओळींचं ट्विट करून म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 05:42 PM2023-03-24T17:42:25+5:302023-03-24T17:43:58+5:30

आज लोकसभा अध्यक्षांनी राहुल यांची खासदारकी रद्द केली. त्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधींनी ट्वीट केले आहे.

Rahul Gandhi first reaction after disqualified as Lok Sabha MP after conviction tweeted only 2 lines see tweet | खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, दोन ओळींचं ट्विट करून म्हणाले...

खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, दोन ओळींचं ट्विट करून म्हणाले...

googlenewsNext

Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदारराहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. मोदी आडनावावर केलेल्या टीकेनंतर सूरत सत्र न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर तात्काळ जामीनही मंजूर केला. त्या निर्णयानंतर चोवीस तासांच्या आत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची ट्विटरवरून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, जर कोणत्याही क्रिमिनल केसमध्ये खासदार आणि आमदारांना 2 वर्षांहून अधिकची शिक्षा ठोठावण्यात आली असेल तर त्यांचे सदस्यत्व (संसद आणि विधानसभा) रद्द केले जाते. इतकेच नव्हे तर शिक्षेची मुदत पूर्ण केल्यानंतर त्यांना सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यासही बंदी घातली जाऊ शकते. याच कायद्यानुसार, राहुल गांधी यांची खासदारदी रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर अखेर त्यांनी ट्विट केले- मैं भारत की आवाज़ के लिए लड़ रहा हूं। मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं। (मी भारताच्या आवाजासाठी लढतो आहे, मी त्यासाठी कितीही मोठी किंमत चुकवायला तयार आहे.) पाहा ट्विट-

राहुल गांधी यांच्यासमोर काय मार्ग?

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांच्यासमोर कायदेशीर मार्ग आहे. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी वरच्या कोर्टाचा दरवाजा ठोठावू शकतात. जर वरच्या कोर्टाने खालच्या कोर्टाचा निर्णय रद्द केला तर राहुल गांधी यांची खासदारकी वाचू शकते. त्यामुळे आता राहुल गांधी काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, या कारवाईनंतर काँग्रेस नेत्यांकडून सरकारविरोधात तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

Web Title: Rahul Gandhi first reaction after disqualified as Lok Sabha MP after conviction tweeted only 2 lines see tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.