समोरची गर्दी मोदी-मोदी नारे देऊ लागली, राहुल गांधींनी अशी दिली प्रतिक्रिया, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 03:27 PM2022-12-05T15:27:57+5:302022-12-05T16:38:29+5:30
काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशात भारत जोडो यात्रा सुरू आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली यात्रा कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातून सध्या ही यात्रा मध्य प्रदेशमध्ये पोहोचली आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशात भारत जोडो यात्रा सुरू आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली यात्रा कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातून सध्या ही यात्रा मध्य प्रदेशमध्ये पोहोचली आहे. या यात्रेतील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.मध्यप्रदेश मधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
राहुल गांधी यांची मध्यप्रदेशमध्ये रॅली झाली. या रॅलीतील हा व्हिडिओ आहे. यात राहुल गांधी यांच्यासमोरील गर्दी मोदी-मोदी असं नारे देत आहेत. या गर्दीला राहुल गांधी यांनी दिलेला रिप्लाय व्हायरल झाला आहे.
Video - मोबाईल दुरुस्तीसाठी नेला, दुकानदाराने हात लावताच बॉम्बसारखा फुटला; झालं असं काही....
गेल्या दोन दिवसापूर्वी काँग्रेसचीभारत जोडो यात्रा मध्यप्रदेशमधील आगर येथे पोहोचली होती. यावेळी ही यात्रा पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी मोदी-मोदी चे नारे दिले. यानंतर राहुल गांधी यांनी त्या गर्दीकडे पाहिले. पहिल्यांदा या लोकांना हात दाखवला. यानंतर मोठ्याने नारे देण्यासाठी इशारा दिला. यानंतर राहुल गांधी यांनी त्या लोकांना फ्लाइंग किस दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा में दर्शक बने कुछ लोगों ने छत से मोदी मोदी के नारे लगाये तो राहुल गांधी ने उनका उत्साहवर्धन करते हुए फ़्लयिंग किस दी ।#BharatJodoYatra#Congress#RahulGandhi#NarendraModi@ranvijaylivepic.twitter.com/baGPBen2aK
— Aviral singh (@aviralsingh7777) December 5, 2022
रविवारी सायंकाळी मध्य प्रदेशातून ही यात्रा राजस्थानमध्ये दाखल झाली. 8 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा पहिल्यांदाच काँग्रेसशासित राज्यात पोहोचली आहे. 21 डिसेंबरला हरियाणात प्रवेश करण्यापूर्वी 17 दिवसांहून अधिक काळ ही यात्रा झालावाड, कोटा, बुंदी, सवाई माधोपूर, दौसा आणि अलवर जिल्ह्यातून सुमारे 500 किलोमीटरचे अंतर पार करेल. यादरम्यान राहुल गांधी 15 डिसेंबरला दौसा येथील लालसोट येथे शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि 19 डिसेंबरला अलवरमधील मालाखेडा येथे जाहीर सभेला संबोधित करतील.