वायनाडमधून राहुल गांधी, अमेठीत सस्पेन्स, महाराष्ट्रात किती जागा मिळणार?; उमेदवारांची पहिली यादी आज येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 09:50 AM2024-03-08T09:50:19+5:302024-03-08T09:51:15+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेस पहिली उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे. काल काँग्रेसची दिल्लीत बैठक झाली.

Rahul Gandhi from Wayanad, Suspense in Amethi, How many seats will get in Maharashtra?; The first list of congress candidates will come today | वायनाडमधून राहुल गांधी, अमेठीत सस्पेन्स, महाराष्ट्रात किती जागा मिळणार?; उमेदवारांची पहिली यादी आज येणार

वायनाडमधून राहुल गांधी, अमेठीत सस्पेन्स, महाराष्ट्रात किती जागा मिळणार?; उमेदवारांची पहिली यादी आज येणार

चार दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर होऊ शकतात. सर्व पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काल काँग्रेसच्या हायकमांडची उमेदवारीबाबत दिल्लीत बैठक झाली, आज काँग्रेस आपली पहिली यादी जाहीर करु शकते. 

काल गुरुवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने  ४० उमेदवारांची नावे निश्चित केली. या यादीत राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. मात्र, यावेळी राहुल गांधी आपल्या पारंपरिक मतदारसंघातून अमेठीतून निवडणूक लढवणार की नाही यावर सस्पेन्स आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई यांचेही नाव निवडणुकीच्या शर्यतीत आहे. रायबरेलीवरही पक्षाची लक्ष आहे.

दुरावलेला मित्र पुन्हा भाजपाशी मैत्री करणार?; लोकसभा निवडणुकीत NDA ची ताकद वाढणार

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीईसी बैठकीत ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ६० लोकसभा जागांवर चर्चा झाली. यामध्ये दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, तेलंगणा, सिक्कीम, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि लक्षद्वीपच्या लोकसभेच्या जागांचा समावेश आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांचाही उमेदवारांच्या यादीत समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

केरळमध्ये पक्षाच्या स्क्रीनिंग कमिटीने वायनाड मतदारसंघासाठी राहुल गांधींचे नाव सुचवले आहे. राहुल गांधी वायनाडमधून पुन्हा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र, राहुल गांधी वायनाडशिवाय अमेठीच्या त्यांच्या जुन्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व्हीडी साठेसन यांनी सांगितले की, पक्ष केरळमध्ये १६ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर मित्रपक्ष चार जागांवर निवडणूक लढवणार आहेत. सठेसन यांनी सांगितले की, सीईसीने १६ जागांसाठी कोण उमेदवार असतील हे ठरवले आहे. एआयसीसी आज उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे.

कर्नाटकवर अजुनही निर्णय नाही

कर्नाटकात ४-५ जागांवर एकमत होऊ शकले नाही. येथे अंतिम निर्णय सर्वोच्च नेतृत्वाला घ्यायचा आहे. या बैठकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या गुलबर्गा जागेवर चर्चा झाली नाही. मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी हे तिकीटाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. खरगे यांनी स्वत: या जागेवरून दोनदा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. मात्र, २०१९ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. खर्गे हे राज्यसभा सदस्य असून त्यांचा ४ वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे. याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यायचा आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील चितापूर विधानसभा मतदारसंघातून खरगे यांचा मुलगा प्रियांक खर्गे सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकला आहे. प्रियांक कर्नाटक सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. खर्गे यांचे जावई दोड्डामणी यांना तिकीट मिळाल्यास ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.

Web Title: Rahul Gandhi from Wayanad, Suspense in Amethi, How many seats will get in Maharashtra?; The first list of congress candidates will come today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.