"राहुल गांधी कदाचित आज उशिरा उठले असतील..."; संसदेत भाजपा खासदाराने उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 04:03 PM2023-08-08T16:03:46+5:302023-08-08T16:10:36+5:30

Rahul Gandhi vs BJP, No trust motion voting: मणिपूर हिंसाचाराच्या प्रसंगानंतर संसदेत आज मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. काँग्रेसचे ...

Rahul Gandhi got trolled by BJP MP Nishikant Dubey on No trust motion voting in Parliament | "राहुल गांधी कदाचित आज उशिरा उठले असतील..."; संसदेत भाजपा खासदाराने उडवली खिल्ली

"राहुल गांधी कदाचित आज उशिरा उठले असतील..."; संसदेत भाजपा खासदाराने उडवली खिल्ली

googlenewsNext

Rahul Gandhi vs BJP, No trust motion voting: मणिपूर हिंसाचाराच्या प्रसंगानंतर संसदेत आज मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. काँग्रेसचे गौरव गोगई यांनी लोकसभेत प्रस्ताव मांडला. त्यानंतर या प्रस्तावर चर्चेला सुरुवात झाली. आज सुरु झालेली चर्चा १० ऑगस्टपर्यंत चालेल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर उत्तर देतील. या चर्चेत राहुल गांधी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर या चर्चेची सुरूवातच राहुल गांधी करणार असल्याची चर्चा रंगली होती. पण प्रत्यक्षात मात्र गौरव गोगई यांनी प्रस्ताव मांडला. त्यावरून भाजपाचे झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल आणि काँग्रेसला चिमटा काढला.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्दबातल ठरवण्यात आली होती. पण नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने त्यांची खासदारकी त्यांना परत बहाल केली. त्यानंतर राहुल आज या चर्चेत सहभागी होतील आणि सुरूवात करतील अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्यानंतर, अविश्वास प्रस्तावाला विरोध दर्शवताना निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी म्हणाले की, "अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी येणार असल्याचे आम्ही यापूर्वी ऐकत होतो, मात्र ते आले नाहीत. कदाचित ते आज सकाळी उशिरा उटले असतील. त्यांना उशिरा जाग आली असेल. म्हणून गौरव गोगई यांनी प्रथम चर्चा सुरू केली."

मी अविश्वास ठरावाच्या विरोधात उभा राहिलो आहे. मणिपूरची चर्चा झाली. एवढ्या महत्त्वाच्या विधेयकावर बोलण्यासाठी पक्षाने मला उभे केले, ही महत्त्वाची बाब आहे. पण काँग्रेसकडून राहुल गांधी न बोलणे हे भाषण लहान करण्याचा प्रकार आहे. यासाठीच त्यांनी गुगली टाकल्यासारखे केले. गौरव गोगई हौतात्म्याबद्दल बोलत होते. पण संपूर्ण काँग्रेसला हौतात्म्याची काहीच माहिती नाही. तुम्हाला मणिपूरबद्दलही माहिती नसेल. तुमच्यापैकी बरेच जण मणिपूरला गेलेही नसतील. मी मणिपूरच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. मणिपूरमध्ये माझ्या मामाचा पाय गमावला. ते 'सीआरपीएफ'चे डीआयजी होते. एन के तिवारी मणिपूरला आयजी म्हणून गेले तेव्हा तुमच्या (काँग्रेस) सरकारने त्यांना अटक केली," असे त्यांनी सांगितले.

"तुम्ही राष्ट्रवादावर बोलत आहात. 83 च्या निवडणुकीत आसाममध्ये किती टक्के लोकांनी मतदान केले. किती लोक मारले गेले. तुम्ही ऑल इंडिया आसाम स्टुडंट युनियनशी करार केला होता तेव्हा त्या कराराचा एक भाग होता की हे सरकार हटवले जाईल. तुमचे सरकार संपेल. तो तडजोडीचा भाग नव्हता का? मी गृहमंत्र्यांना सांगेन की त्यांनी उत्तर देताना कराराचे संपूर्ण स्वरूप सांगावे", असेही ते म्हणाले.

Web Title: Rahul Gandhi got trolled by BJP MP Nishikant Dubey on No trust motion voting in Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.