मी निर्दोष, संघावर केलेल्या आरोपांवर राहुल गांधी कोर्टात ठाम; जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 11:35 AM2019-07-04T11:35:14+5:302019-07-04T11:48:54+5:30

गौरी लंकेश हत्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांप्रकरणी दाखल मानहानीच्या खटल्याच्या उपस्थित राहिलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याप्रकरणात आपण दोष नसल्याने न्यायालयासमोर सांगितले.

Rahul Gandhi has been released on Rs 15000 surety amount | मी निर्दोष, संघावर केलेल्या आरोपांवर राहुल गांधी कोर्टात ठाम; जामीन मंजूर

मी निर्दोष, संघावर केलेल्या आरोपांवर राहुल गांधी कोर्टात ठाम; जामीन मंजूर

Next

मुंबई - गौरी लंकेश हत्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांप्रकरणी दाखल मानहानीच्या खटल्याच्या उपस्थित राहिलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याप्रकरणात आपण दोष नसल्याने न्यायालयासमोर सांगितले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांवरही आपण ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर या खटल्यामध्ये राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला. मुंबईतील काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड हे राहुल गांधींसाठी जामीन राहिले. 


गौरी लंकेश हत्या प्रकरणी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांनंतर त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी आज शिवडी येथील न्यायालयात उपस्थित राहिले. यावेळी आपण निर्दोष असल्याचे तसेच गौरी लंकेश हत्येप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक  संघावर केलेल्या आरोपांवर आपण ठाम असल्याचे राहुल गांधी यांनी न्यायलयासमोर सांगितले. त्यानंतर न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या हमीवर त्यांचा जामीन मंजूर केला. काँग्रेसचे मुंबईतील नेते एकनाथ गायकवाड यांनी राहुल गांधींसाठी जांमीन दिला. 

दरम्यान, राहुल गांधी आज मुंबईत येत असल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विमानतळावर तसेच शिवडी येथील न्यायालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. तसेच राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात येत होती. 

 

Web Title: Rahul Gandhi has been released on Rs 15000 surety amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.