राहुल गांधींनी मतदारसंघातील पूरग्रस्तांची भेट घेतली, मोदींसोबत 'फोन पे चर्चा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 01:42 PM2019-08-12T13:42:42+5:302019-08-12T18:45:24+5:30
केरळात मुसळधार पावसाचा कहर सुरूच असून पूर, भूस्खलन व पावसाशी संबंधित दुर्घटनांत आतापर्यंत 76 जणांचा मृत्यू झाला आहे.
तिरुवनंतपुरम : केरळात मुसळधार पावसाचा कहर सुरूच असून पूर, भूस्खलन व पावसाशी संबंधित दुर्घटनांत आतापर्यंत 76 जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाखापेक्षा अधिक लोकांना सुरक्षितपणे शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी कॅांग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड गावातील रहिवाश्यांची भेट घेतली. तसेच रहिवाशांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू मदत म्हणून देण्यात येत आहेत.
याच दौऱ्यावेळी राहुल गांधींनी केरळ राज्याचे मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना देखील फोनवर चर्चा करुन केंद्र सरकारकडून मदत करण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी रहिवाशांना सांगितले.
Rahul Gandhi, Congress at a relief camp in Kaithapoyil, Wayanad: As your MP, I called CM & requested him to help here as aggressively as possible. I also called the PM &explained to him the tragedy that has taken place here &the need for support from the centre.#KeralaFloods2019pic.twitter.com/pKGpqPZl0w
— ANI (@ANI) August 12, 2019
तसेच गेल्या काही दिवसात महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, केरळ या चार राज्यात अतिवृष्टीमुळे एकुण 174 जणांना प्राण गमवावा लागला. तसेच यामध्ये केरळमध्ये 76 जणांचा मृत्यू झाला आहे तर, महाराष्ट्रात 35 आणि गुजरात व कर्नाटक राज्यात 31- 31 जणांचा मृत्यू झाला आहे.
Kerala: Rahul Gandhi, Congress meets and distributes relief material to the people of his Lok Sabha constituency. #Wayanadpic.twitter.com/CJuT6TAAg6
— ANI (@ANI) August 12, 2019