"...तर बड्या नेत्यांचंही तिकीट कापणार"; राहुल गांधी यांनी दिले संकेत, नेत्यांसमोर घातली अशी अट   

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 10:53 AM2024-08-20T10:53:56+5:302024-08-20T11:06:16+5:30

Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीत केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर काँग्रेसने (Congress) यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी सोमवारी झालेल्या काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

... Rahul Gandhi has put a condition before the Congress leaders that he will cut the ticket of big leaders too    | "...तर बड्या नेत्यांचंही तिकीट कापणार"; राहुल गांधी यांनी दिले संकेत, नेत्यांसमोर घातली अशी अट   

"...तर बड्या नेत्यांचंही तिकीट कापणार"; राहुल गांधी यांनी दिले संकेत, नेत्यांसमोर घातली अशी अट   

हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. तसेच सर्वच प्रमुख पक्षांनी या निवडणुकीसाठीच्या तयारीला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर काँग्रेसने या विधानसभा निवडणुकीसाठीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी सोमवारी झालेल्या काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच हरियाणा आणि काश्मीरमधील तिकीट वाटपाबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कठोर भूमिका घेतल्याचेही दिसून आले.

राहुल गांधी यांनी या बैठकीमध्ये सांगितले की, कितीही मोठा नेता असला तरी केवळ त्यांच्या शिफारशीच्या आधारावर उमेदवारी देण्यात येऊ नये. तर पक्षातील सक्षम कार्यकर्त्याला उमेदवारी दिली गेली पाहिजे. मग त्याच्या नावाची शिफारस कुठल्या बड्या नेत्याने केलेली नसली तरी हरकत नाही. तसेच बाहेरून आलेला नेता विजय मिळवू शकतो किंवा निवडून येण्यासाठी आवश्यक आमुग्री त्याच्याकडे आहे, एवढ्या कारणामुळे त्याला उमेदवारी दिली जाऊ नये, तर पक्षाच्या कार्यकर्त्याचा विजय होण्याची शक्यता असेल, तर त्याला उमेदवारीसाठी प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, कुठल्याही नेत्याला केवळ तो मोठा नेता आहे म्हणून तिकीट मिळणार नाही. नेता मोठा असेल आणि तो विजयी होण्याची शक्यता असेल, पण त्याच्यावर भ्रष्टाचार, गंभीर आरोप, महिला आणि दलितांविरोधातील गंभीर गुन्ह्याबाबत खटला सुरू असेल तर त्यांना उमेदवारी मिळता कामा नये. तसेच उमेदवार निश्चितीसाठी पक्षाकडून सर्व्हेही केला जात आहे. त्यामुळे तुमच्याकडून सुचवली जाणारी नावं आणि पक्षाकडून करण्यात येणाऱ्या सर्व्हेमधून समोर येणारी नावं, यांची पडताळणी केली जाईल, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.  

Web Title: ... Rahul Gandhi has put a condition before the Congress leaders that he will cut the ticket of big leaders too   

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.