'हिंसेने तोडगा निघणार नाही, शांतता हाच एकमेव उपाय', राहुल गांधींनी घेतली पीडितांची भेट...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 03:05 PM2023-06-30T15:05:48+5:302023-06-30T15:17:08+5:30
Manipur Violence: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या हिंसाग्रस्त मणिपूर राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मदत छावण्यांमध्ये पीडित नागरिकांची भेट घेतली.
Rahul Gandhi In Manipur: गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. राज्यातील हिंसाचारामुळे बाधित हजारो लोकांना छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी या हिंसाचारग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर असून, आज त्यांनी पीडितांची भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शांततेचा संदेश दिला.
#WATCH मणिपुर को शांति की जरूरत है। मैं राहत शिविर में गया और हर समुदाय के लोगों से मिला। राहत शिविरों में दवाई, खाने की कमी है जिस पर सरकार को ध्यान देना चाहिए। मेरी मणिपुर के हर व्यक्ति से अपील है कि शांति बनाए रखें। मैं यहां मौजूद हूं और जो शांति कि लिए कर सकता हूं वह करूंगा:… pic.twitter.com/1mvg4Zz45g
— ANI_HindiNews (@AHindinews) June 30, 2023
राहुल गांधी म्हणाले, मी आज मणिपूरमधील मदत छावण्यांमध्ये गेलो आणि प्रत्येक समाजातील लोकांना भेटलो. मदत छावण्यांमध्ये औषधांचा आणि अन्नाचा तुटवडा आहे, त्याकडे सरकारने लक्ष द्यावे. मी मणिपूरच्या प्रत्येक व्यक्तीला शांतता राखण्याचे आवाहन करतो. मणिपूरला शांतता हवी आहे, शांततेसाठी माझ्याकडून जे काही करता येईल ते करेन.
इन मासूमों पर नफरत की आंच नहीं पड़ने देंगे।
— Congress (@INCIndia) June 30, 2023
📍 मोइरांग, मणिपुर pic.twitter.com/dfn7bRhn2w
राहुल गांधींनी आज (30 जून) बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग शहरातील दोन मदत शिबिरांना भेट दिली. राहुल गांधी हेलिकॉप्टरने सकाळी 9.30 च्या सुमारास मोइरांग येथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी पीडित लोकांची भेट घेतली आणि त्यांच्या तक्रारी ऐकल्या. राहुल गांधी यांच्यासोबत मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग, पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, पीसीसी अध्यक्ष कीशम मेघचंद्र सिंह आणि माजी खासदार अजय कुमार उपस्थित होते.