Rahul Gandhi in UK: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काय शिकतात राहूल गांधी? केम्ब्रिजमध्ये शेअर केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 11:41 AM2022-05-25T11:41:25+5:302022-05-25T11:43:24+5:30
Rahul Gandhi in UK : केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये (Cambridge University) एका चर्चा सत्रादरम्यान राहुल गांधी म्हणाले, 'आपले वडील राजीव गांधी यांचा एका हल्ल्यात झालेला मृत्यू, हा आपल्यासाठी शिकवण देणारा जीवनातील सर्वात मोठा अनुभव होता.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी आपल्या लंडन दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून होणाऱ्या हल्यांसंदर्भात भाष्य केले आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांकडे दोन दृष्टीकोनातून बघितले जाऊ शकते. याच बरोबर, आपले वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मृत्यू, जीवनात खूप काही शिकवनारा आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. (Rahul Gandhi in Cambridge University)
पंतप्रधान मोदींकडून काही शिकू शकतो - राहुल गांधी
भारतातील दैनंदीन राजकीय जीवनावर भष्य करताना रोहुल गांधी म्हणाले, 'जर मी मागे वळून पाहिले तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) माझ्यावर सातत्याने हल्लाबोल करत असतात. अशात मी म्हणेन की अरे देवा, ते किती वाईट आहेत. ते माझ्यावर निशाणा साधत आहेत. याशिवाय, याच्याकडे पाहण्याची एक दुसरा दृष्टीकोनही आहे, की खूपच छान, मी त्यांच्यापासून (मोदी) काही शिकू शकतो, मला आणखी काही तरी शिकवा.'
वडिलांचा मृत्यू खूप काही शिकवणारा - राहुल गांधी
केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये (Cambridge University) एका चर्चा सत्रादरम्यान राहुल गांधी म्हणाले, 'आपले वडील राजीव गांधी यांचा एका हल्ल्यात झालेला मृत्यू, हा आपल्यासाठी शिकवण देणारा जीवनातील सर्वात मोठा अनुभव होता. राहुल गांधी म्हणाले, या घटनेमुळे आपल्याला काही अशा गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्या आपण कधीही शिकू शकलो नसतो.' तमिळनाडूतील एका निवडणूक सभेदरम्यान 'लिट्टे'च्या आत्मघातकी हल्ल्यात 21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांचा मृत्यू झाला होती.