'भाजपचे हिंदुत्व; इंडिया आणि भारत', पुन्हा एकदा परदेशातून राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 05:50 PM2023-09-10T17:50:57+5:302023-09-10T17:52:35+5:30
Rahul Gandhi Europe Visit: राहुल गांधी यांनी पॅरिसमध्ये बोलताना भाजपवर जोरदार टीका केली.
Rahul Gandhi In Paris:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा परदेशातून भारत सरकारवर निशाणा साधला आहे. युरोप दौऱ्यावर असलेले राहुल गांधी पॅरिसमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी इंडिया-भारत वाद आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. ज्यांना एखाद्या गोष्टीचे नाव बदलायचे आहे, ते इतिहास नाकारण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
'मी गीता वाचली'
राहुल म्हणाले, आपल्या राज्यघटनेत 'इंडिया म्हणजेच भारत' अशी व्याख्या करण्यात आली आहे. या राज्यांना एकत्र करुन इंडिया किंवा भारत बनला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राज्यांमध्ये सर्व लोकांचा समावेश आहे. त्यांचा आवाज ऐकला जातो, कुणाचाही आवाज दाबला जात. मी गीता, उपनिषदे आणि इतर अनेक हिंदू पुस्तके वाचली आहेत, परंतु भारतीय जनता पक्ष (भाजप) जे काही करत आहे, त्याचा हिंदू धर्माशी काही संबंध नाही. नाव बदलणारे लोक इतिहास नाकारण्याचा प्रयत्न करत आहे,' अशी टीका त्यांनी यावेळी केली.
INDIA, Bharat Jodo Yatra, Geo-politics, Cronyism and other national & global issues - An engaging conversation with the students and faculty at Sciences PO University, Paris, France.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 10, 2023
Watch the full video on my YouTube Channel:https://t.co/emcHLwBQoIpic.twitter.com/COXVM1zcAL
'दुर्बलांचा गैरवापर थांबवला पाहिजे'
'भाजप आणि आरएसएसचे लोक कनिष्ठ जाती, ओबीसी, आदिवासी जाती आणि अल्पसंख्याक समुदायांच्या अभिव्यक्ती आणि सहभाग दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांवर देशात अत्याचार आणि हल्ले होत आहेत. मला हवा असलेला हा भारत नक्कीच नाही. ही समस्या सोडवण्यासाठी ज्या प्रकारची राजकीय कल्पनाशक्ती आवश्यक आहे, ती आजच्या भारतात नाही,' अशी टीकाही राहुल गांधी यांनी यावेळी केली.