"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 10:04 PM2024-09-30T22:04:27+5:302024-09-30T22:05:33+5:30

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली.

"Rahul Gandhi is innocent, considers himself a phantom", Himanta Biswa Sarma's criticism | "राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका

"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका

Himanta Biswa Sarma on Rahul Gandhi : भाजपचे फायरब्रँड नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) अनेकदा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर अतिशय टोकाची टीका करत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी राहुल यांच्यावर बोचरी टीका केली आहे. सोमवारी(30 सप्टेंबर) झारखंडची राजधानी रांची येथे जाहीर सभेला संबोधित करताना सीएम सरमा यांनी राहुल गांधींना कार्टून पाहण्याचा सल्ला दिला.

हिमंता म्हणाले की, "राहुल गांधी हे निष्पाप बालकासारखे आहेत. त्यांनी लहानपणी कॉमिक्स वाचली असतील, म्हणूनच ते स्वतःला फॅन्टम समजतात. मला कात्री आहे की, ते अजूनही घरात बसून कार्टून पाहतात," असी बोचरी टीका त्यांनी केली. 

'भारतातही नसरल्लाह आहेत...'
दरम्यान, इस्त्रायली हल्ल्यात हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या निदर्शनांबाबत हिमंता यांनी पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना उद्देशून म्हटले की, "नसराल्लाहचा मृत्यू झाला, म्हणून हे लोक रडत आहेत. आता भारतातही काही नसरल्ला आहे, त्यांनाही शोधून मारावे लागेल." 

झारखंडमध्ये जागावाटप जवळपास अंतिम 
झारखंड विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावर सीएम सरमा म्हणाले की, "आमचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. आम्ही JDU आणि AJSU सोबत निवडणूक लढवणार आहोत. आम्हाला JDU आणि AJSU साठी काही जागा सोडाव्या लागतील. यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. 2-3 बैठकाही झाल्या असून, 3-4 ऑक्टोबरपर्यंत आम्ही जागांबाबत अधिकृत घोषणादेखील करू."

नसरल्लाहच्या मृत्यूवर मेहबुबा यांना शोक
इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवरील हल्ले तीव्र केले आहेत. नुकताच इस्रायलच्या हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात हिजबुल्ला प्रमुख नसराल्लाहसह अनेक कमांडर मारले गेले. यानंतर पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी हिजबुल्लाचा नेता नसरल्लाह याचे वर्णन शहीद असे केले. तसेच निषेधार्थ आपल्या प्रचाराचा कार्यक्रमही रद्द केला. नसरल्लाह याच्या निधनावर शोक व्यक्त करताना पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले की, “मी लेबनॉन आणि गाझामधील शहीदांच्या, विशेषत: हसन नसराल्लाह याच्या समर्थनार्थ रविवारचा निवडणूक दौरा रद्द करत आहे. आम्ही पॅलेस्टाईन आणि लेबनॉनच्या लोकांसोबत उभे आहोत.” 

 

Web Title: "Rahul Gandhi is innocent, considers himself a phantom", Himanta Biswa Sarma's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.