भारताच्या संविधानाला धोका, भाजपाचे नेते करतायेत छेडछाड- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 02:46 PM2017-12-28T14:46:05+5:302017-12-28T14:56:17+5:30
'राजकीय फायद्यासाठी भाजपा फक्त खोटं बोलत असून त्यांच्यामुळे आज देशाला धोका निर्माण झाला आहे,' असं सांगतानाच भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला भाजपपासून धोका आहे.
नवी दिल्ली- 'राजकीय फायद्यासाठी भाजपा फक्त खोटं बोलत असून त्यांच्यामुळे आज देशाला धोका निर्माण झाला आहे,' असं सांगतानाच भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला भाजपपासून धोका आहे. घटना बदलण्यासाठी भाजप गुपचूप कारस्थानं करत आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भाजपावर जोरदार टीका केली.
The Constitution, the foundation of our country is under threat, it is under attack directly, statements are being made by senior members of BJP & it is under attack surreptitiously from the back & its our duty, duty of Cong party & every single Indian to defend it: Rahul Gandhi pic.twitter.com/x8iZfKBMaF
— ANI (@ANI) December 28, 2017
काँग्रेस पक्षाला 133 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भाजपाच्या नेत्यांवर देशाच्या संविधानात छेडछाड करत असल्याचा आरोप केला. भाजपा संविधानाशी गुप्तपणे छेडछाड करते आहे, असं राहुल गांधी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.
'आज देशाशी धोकेबाजी केली जात आहे. भाजपा राजकीय फायद्यासाठी खोटं बोलत असून त्यांच्यात आणि आपल्यात हाच फरक आहे. आपण काही चांगलं केलं नसेल, आपण निवडणुकांमध्ये पराभूत झालो असू. पण आपण सत्याची कास सोडता कामा नये,' असं आवाहन राहुल गांधी त्यांनी केलं
काँग्रेस अध्यक्ष राहुल यांनी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना 'जेटलाइ' ( जेट असत्य) असं म्हंटत टीका केली होती.