Rahul Gandhi: राहुल गांधींच्या मागे दिसत असलेला कमल मुनीर कोण आहे?, भाजपने पाकिस्तानी कनेक्शन जोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 11:55 AM2023-03-07T11:55:36+5:302023-03-07T12:00:36+5:30

Rahul Gandhi: गेल्या काही दिवसापासून काँग्रेस नेते राहुल गांधी लंडन दौऱ्यावर आहेत. गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे.

rahul gandhi london news who is kamal munir pakistani sharing stage bjp attacks | Rahul Gandhi: राहुल गांधींच्या मागे दिसत असलेला कमल मुनीर कोण आहे?, भाजपने पाकिस्तानी कनेक्शन जोडले

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या मागे दिसत असलेला कमल मुनीर कोण आहे?, भाजपने पाकिस्तानी कनेक्शन जोडले

googlenewsNext

Rahul Gandhi: गेल्या काही दिवसापासून काँग्रेस नेते राहुल गांधी लंडन दौऱ्यावर आहेत. गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. संसदेतील विरोधी सदस्यांचे माईक बंद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसची वेळ संपली आहे, असे म्हणणे हास्यास्पद आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. भाजप नेहमी सत्तेत राहील असं अनेकांना वाटते पण तसे नाही. दरम्यान, केंब्रिज विद्यापीठातील राहुल गांधींचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये राहुल गांधी भाषण करताना दिसत आहेत पण त्यांच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीच्या उपस्थितीवर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावरुन भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

Crime: तलावात सापडू लागलं सोनं, कोट्यवधी रुपयांमध्ये किंमत, सुरक्षा यंत्रणा अवाक्

या फोटोत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या पाठिमागे कमल मुनीर दिसत आहेत, त्यांच्या फोटोवरुन आता आरोप सुरू झाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी दोन फोटो ट्विट करत राहुल गांधींना प्रश्न उपस्थित केले आहेत. 'ये रिश्ता क्या कहलाता है?' त्यांनी पुढे लिहिले की, 'मणीशंकर अय्यर यांना पंतप्रधान मोदींना हटवण्यासाठी पाकिस्तानी हस्तक्षेप कसा हवा होता हे आठवते. आता राहुल गांधींना भारतात परकीय हस्तक्षेप हवा आहे. मुनीरसोबत स्टेज शेअर करत आहेत. ही व्यक्ती कोण आहे हे स्पष्ट आहे...लज्जास्पद.' अशा स्थितीत लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होऊ लागला की राहुलच्या शेजारी खिशात हात टाकून उभी असलेली व्यक्ती कोण?


शहजाद यांनी शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोत प्राइड ऑफ पाकिस्तान पेजवर डॉ. कमाल मुनीर दिसत आहेत. अशा परिस्थितीत कमल मुनीर कोण आहे हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. त्याचा पाकिस्तानशी काही संबंध आहे का? राहुल गांधींच्या कार्यक्रमात ते काय करत होते? वास्तविक, कमल मुनीर केंब्रिज विद्यापीठात प्र-कुलगुरू आहेत. ते स्ट्रॅटेजी आणि पॉलिसीचे प्राध्यापकही आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींचा फोटो शेअर करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपच्या आयटी टीमचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केले की, "राहुल गांधींचा केंब्रिज कार्यक्रम, जिथे ते भारताविषयी मूर्खपणाचे बोलले, ते एका पाकिस्तानी व्यक्तीने आयोजित केले होते. लाजिरवाणे, असं त्यांनी म्हटले आहे.

कमालशी संबंधित बातम्यांचे अनेक स्क्रीनशॉट शेअर केले जात आहेत. यामध्ये ते पाकिस्तानी वंशाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. ते पाकिस्तानातील लाहोरचे आहे हे खरे आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी त्यांना तमगा-ए-इम्तियाजने सन्मानित केले आहे. हा पुरस्कार पाकिस्तानी वंशाच्या एका नागरिकाला दिला जातो ज्याने जगात आपल्या क्षेत्रात स्थान मिळवले आहे.

कमल मुनीर यांनी लाहोर येथील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. यानंतर ते मॅकगिल युनिव्हर्सिटी कॅनडातून पीएचडी करण्यासाठी गेले. 2021 मध्ये त्यांचा विद्यापीठाने गौरवही केला होता. ते सध्या केंब्रिज येथील जज बिझनेस स्कूलमध्ये प्राध्यापक, प्र-कुलगुरू तसेच विभागाचे संचालक आहेत.

Web Title: rahul gandhi london news who is kamal munir pakistani sharing stage bjp attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.